Prarthana Behre: प्रार्थना बेहरेचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली,’ नवरा मला रोज…’

Prarthana Behre: प्रार्थना बेहरेचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली,’ नवरा मला रोज…’

Prarthana Behre: प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात असते. प्रार्थनाने २००९ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. (Social media) ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील सिरीयलमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. परंतु, अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहरे एक टीव्ही रिपोर्टर होती. परंतु सध्या ती नवऱ्याविषयी केलेलं वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे.

प्रार्थना अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे म्हणजेच अभिषेक जावकरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर करत असते. या पोस्टमधून कायम त्यांच्यातील प्रेम बघायला मिळत असत. परंतु यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने चक्क माझा नवरा मला मारतो, असं धक्कादायक विधान यावेळी त्यानं केले आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. परंतु नेमकं हे प्रकरण काय आहे, असा प्रश्न सध्या चाहते करत असल्याचे बघायला मिळत आहे.

प्रार्थनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या नव्या व्हिडीओचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये तिने तिच्या फिल्मी करिअरबद्दल आणि खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगितले आहे. तिच्या या टीझरवरुन येणाऱ्या व्हिडीओत ती नेमकं कोणत्या गोष्टींवर वक्तव्य करणार याचा अंदाज लावला जात आहे. प्रार्थनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर हा टीझर शेअर करत असतं तिने चाहत्यांना तिच्या नव्या युट्यूब चॅनेलला भेट देण्याची विनंती देखील यावेळी तिने केली आहे.

Aatmapamphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला…

दरम्यान, प्रार्थना बेहेर २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सिरीयलमधून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या सिरीयलला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube