Aatmapamphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला…
Aatmapamphlet: गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांवर आधारित मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक विषय, महिला केंद्रीत यांसह (Aatmapamphlet Marathi Movie) आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. परंतु आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मदत करत असल्याचे बघायला मिळाले आहे.
View this post on Instagram
ललित प्रभाकर म्हणजे यामध्ये देखणेपणाने (Social media) आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईमध्ये विशेषतः तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत विविध भूमिका साकारले आहेत. चिं व चि. सौ. का सारख्या सिनेमातील मस्तीखोर आणि अतरंगी मुलगा तर आनंदी गोपाळ मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा बघितल्या आहेत.
परंतु आता ललितची एक अनोखी नवीन बाजू चाहत्यांना बघायला मिळाली आहे. ललित चक्क परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना मदत करत असल्याचे बघायला मिळाले आहेत. आता त्याने हे असे का केले याचे कारण ललितने स्वतःच सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, ”आशिष माझा खूप जवळचा जिवलग मित्र आहे आणि त्याच्या पहिल्या सिनेमाचा मला भाग व्हायचे होते. आशिष एक व्यक्ती म्हणून तर एक उत्तम कलाकार देखील आहे, याशिवाय एक दिग्दर्शक म्हणून देखील तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोजेक्टमध्ये माझा काहीतरी सहभाग असावा, असे मला मनापासून वाटत असायचे. या कारणाने मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर
हा अनुभव माझ्यासाठी खूपच मस्त राहिला आहे. त्यामध्ये झी स्टुडिओज, परेश मोकाशी यांच्यासोबत देखील माझे एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टच्या निर्मितीमध्ये थोडा फार का होईना, माझा हातभार लागला आणि याचा मला विशेष आनंद आहे. या सिनेमातील बालकलाकार सर्वच एकदम जबरदस्त आहेत. काय कमाल अभिनय करतात ही मुले. त्यांच्यासोबत देखील थोडी मजामस्ती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी व झी स्टुडिओ प्रस्तुत मयसभा करमणूक मंडळ निर्मित ‘आत्मपॅम्प्लेट’ या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ६ ॲाक्टोबर रोजी ‘आत्मपॅम्फ्लेट’ प्रदर्शित होत आहे.