Download App

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी अन् जसराज जोशीची लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाली…

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) हे लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंंट करुन अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.


आनंदी आणि जसराज यांनी शेअर यांनी त्यांच्या कोर्ट मॅरिजचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो.” अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित, गायक सलील कुलकर्णी, अभिनेत्री श्रेया बुगडे असे अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी देखील आनंदी आणि जसराज यांना शुभेच्छा देत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आनंदी ही पेस्टल ग्रीन कलरची साडी आणि ज्वेलरीच्या लूकमध्ये एकदम हटके अंदाजात दिसत आहे. तर जसराज हा ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट पँट अशा लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाजी’ कोण मारणार, सनी पाजी की खिलाडी? जाणून घ्या कलेक्शन

२०१२ मधील ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाचा जसराज विजेता ठरला होता. सतरंगी रे, हायवे, डबल सीट अशा हटक्या सिनेमामधील गाणी जसराजनं गायली आहेत. तर आनंदी ही देखील प्रसिद्ध गायिका आहे. तिनं दुनियादारीमधील देवा तुझ्या गभर्याला, बरासून ये, किती सांगायचय मला ही हटके गाणी गायली आहे. २००६ च्या दरम्यान ती आयडिया ‘सा रे ग मा पा’ या रिअॅलिटी म्युझिक शोमध्ये 3 री रनर अप ठरली होती. त्याच सोबत ‘तुझ माझा जमेना’ या सिरियलचे टायटल साँग्स देखील आनंदीनं गायले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज