Download App

Avdhoot Gupte: गायक अवधूत गुप्ते करणार मनातील प्रेमभावना ; म्हणतोय, “तुझ्याविना…”

Avdhoot Gupte: अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) यांनी सोशल मीडियावर (social media) ‘विश्वामित्र’ (Vishwamitra album) या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. (social media) ही प्रेमकथा आपल्याला येत्या 2 फेब्रुवारीला समजणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=pgCkJdW0pvs

अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी प्रेम होते. कोणाचे प्रेम शेवटपर्यंत टिकते तर कोणाची साथ अर्ध्या वाटेतच सुटते. या माझ्या मित्रमैत्रिणींच्या तुटलेल्या हृदयातील भावना मी या गाण्यातून मांडल्या आहेत. या गाण्यातील कथा, भावना मनात खोलवर भिडणाऱ्या आहेत. जसे प्रेम संगीतप्रेमींनी ‘विश्वामित्रा’च्या पहिल्या गाण्याला दिले, प्रेक्षकांची तीच पसंती या गाण्यालाही मिळेल.

BMC कर्मचाऱ्यांवर ‘जात’ मुद्द्यावरुन भडकणाऱ्या पुष्करला किरण मानेंनी फटकारलं

तुझ्या विना हे गाणं येत्या 2 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अवधूत गुप्तेचं संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. याआधी त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

follow us