singer Mohit Suri Overwhelmed by singer Vishal Mishra’s statement : यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी (singer Mohit Suri) यांची सैयारा ही सध्या सर्वाधिक गाजणारा म्युझिक अल्बम ठरत आहे. टायटल ट्रॅक सैयारा आणि जुबिन नौटियालचं भावस्पर्शी बर्बाद नंतर आता तिसरं गाणं तुम हो तो रिलीज झालं आहे. हे गाणं आजच्या पिढीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गायक विशाल मिश्रा ने गायले आहे.
Video : बडगुजरांना ‘कमळ’चा गुच्छ मिळणार?; बावनकुळे अनभिज्ञ पण, चव्हाणांनी दिली हिंट
मोहित सूरी (singer Mohit Suri) म्हणाला की तो विशालला 12 वर्षांपासून ओळखतात आणि जेव्हा त्याला कळलं की त्याच्या गाण्यांमुळे विशालने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला – तेव्हा तो क्षण अत्यंत भावुक होता. पुढे तो म्हणाला ,”विशाल 12 वर्षांपूर्वी मला भेटायला आला होता. तेव्हाच ठरवलं होतं की एकत्र काही खास करायचं. आणि सैयारा साठी ही संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. तो म्हणाला की माझं संगीत ऐकून त्याला प्रेरणा मिळाली – हे ऐकून खूप समाधान वाटलं.”
तो (singer Mohit Suri) पुढे म्हणतो ,”जेव्हा एखादी कला कोणाच्या आयुष्यात इतका मोठा प्रभाव टाकते, तेव्हा ती कलाच खास बनते. मला 20 वर्षांच्या करिअरमध्ये हे समाधान आहे की माझ्या गाण्यांनी लोकांच्या भावना स्पर्श केल्या आहेत.”मोहित सूरी विशालच्या यशाबद्दल अतिशय आनंदी आहे:”तो नेहमी मला स्क्रॅच ट्रॅक्स घेऊन भेटायचा. त्यातली प्रामाणिकता, ती भावना – सगळं काही आता तुम हो तो मध्ये अनुभवायला मिळतं. हे गाणं त्याच्या करिअरमधील सर्वात सुंदर प्रेमगीत ठरू शकतं.”
बडगुजरांची राजकीय ताकद फायद्याचीच, टोकाच्या विरोधानंतरही फडणवीसांचा ‘Go Ahead’
चित्रपट सैयारा मध्ये नवीन कलाकार आहान पांडे आणि अनीत पड्डा यांची गोड केमिस्ट्री दिसणार आहे. चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.वायआरएफ च्या रोमँटिक सिनेमाचा वारसा आणि मोहित सूरीच्या (singer Mohit Suri) दिग्दर्शनातली भावनिक खोली – या दोघांची जोड पुन्हा एकदा एक अविस्मरणीय प्रेमकथा घेऊन आली आहे.