Sudhakar Badgujar यांच्या हाती ‘कमळ?; बावनकुळे अनभिज्ञ पण, चव्हाणांनी दिली हिंट

Ravindra Chavhan On Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडं कोणतीही माहिती नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनीदेखील आजचा दिवस पक्षप्रवेशाचा असतो तीन वाजेपर्यंत वाट पहा असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे आता तीन वाजता सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा भाजपप्रवेश होणार का? आणि नेमका कुणाच्या उपस्थित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते.
बडगुजरांची राजकीय ताकद फायद्याचीच, टोकाच्या विरोधानंतरही फडणवीसांचा ‘Go Ahead’
काय म्हणाले चव्हाण?
पत्रकार परिषदेला संबोधित करताना चव्हाण यांना नाशिक येथील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, मंगळवार हा पक्षप्रवेशासाठी आहे काही गोष्टी गुलदस्तात आहे त्या गुलदस्त्यातच राहू द्या असे सूचक विधान करत तीन वाजेपर्यंत वाट बघा असे उत्तर देत सस्पेन्स अधिक वाढवला आहे. आज मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे सर्व पक्षप्रवेश दुपार तीन नंतर पार पडतील. तीन वाजेपर्यंत वाट पहा असं म्हणत भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात मौन बाळगल्याचे चित्र आहे.
नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसातच ठाकरे शिवसेनेकडनं शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. बडगुजर हे भाजपात जाणार याविषयीचे तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता बडगुजर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.
कॅसिनोसोबतच्या व्हायरल फोटोचा बडगुजरांवर बोजा; बावनकुळेंना ‘तो’ संशय, भाजप प्रवेश लटकला
बडगुजरांनी संपूर्ण फळीच फोडली
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशमुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह असतानाच बडगुजर यांनी त्यांच्या पाठोपाठ मोठी फळीच सोबत घेत ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर बडगुजर हे आपल्या सोबत माजी मंत्री बबनराव घोलप, माजी 15 नगरसेवक आणि हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. Ravindra Chavhan On Sudhakar Badgujar
बावनकुळे अनभिज्ञ
सुधाकर बडगुजर आपल्या कार्यकर्त्यांसह नाशिक वरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती आपल्याकडे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपात स्थानिक टीम, पदाधिकारी, खासदार आमदार यांच्यासोबतच्या चर्चेअंती एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिकांचा विरोध असल्याचे आणि प्रदेशाध्यक्षचं अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना आजही खंबीर अन् अभेद्यच; ज्यांना जायचं ते गेले, राऊतं बडगुजरांवर काय बोलले?
तीनवाजेपर्यंत वाट : रवींद्र चव्हाण
नाशिक येथील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना माहिती नसल्या बाबतच्या प्रश्न भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारला असता यांनी काही प्रतिक्रिया न देता तीन पर्यंत वाट पहा असं सांगत विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे.तसेच भाजपा कडून मंगळवार हा दिवस पक्षप्रवेशासाठी असतो. आज मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे सर्व पक्षप्रवेश दुपार तीन नंतर पार पडतील. तीन वाजेपर्यंत वाट पहा असं म्हणत भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात सस्पेन्स वाढवत एकप्रकारे बडगुजरांच्या हाती कमळ कधी आणि किती वाजता दिले जाणार याची हिंट दिली आहे.