भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमालाच 100 नगरसेवकांनी मारली दांडी; नावे टीपली, आता कारवाई होणार?
Ravindra Chavan BJP Program; रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपच्या पुण्यातील प्रचार कार्यक्रमाला 100 हून अधिक नगरसेवकांची गैरहजेरी.
Ravindra Chavan BJP Program, Pune Graduate and Teachers Constituency: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह पत्रातील अनेक मोठ-मोठे नेते उपस्थित होते. मात्र महापालिकेतील भाजपच्या 126 नगरसेवकांपैकी 100 पेक्षा अधिक नगरसेवक या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला आलेच नाहीत. 100 हून अधिक नगरसेवकांना चक्क प्रदेशाध्यक्ष आणि मोठ्या नेत्यांच्या उपस्थीतीत असलेल्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने पक्षातील शिस्तीबाबत प्रश्न निर्माण झाला.
विदेशी ताकद यांच्या पाठीशी, भारतात अराजकता…; नितीन नबीन यांचे गंभीर आरोप
नगरसेवकांच्या या गैरहजेरीची नोंद मात्र सभागृहनेते गणेश बिडकरांनी घेतली. त्यामुळे गैरहजर नगरसेवकांवर आता कारवाई होणार का? अशी चर्चा होत आहे.
प्रचार शुभारंभाचा हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे यांची उपस्थिती होती.
एकतर 100 हून अधिक नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारली. मात्र कार्यक्रमाला आलेल्या नगरसेवकांनीही कार्यक्रम सुरु होण्यापुर्वीच तिथून निघून गेले. शेवटी गणेश बिडकरांनी एका नगरसेवकाला कार्यक्रमाला हजर असलेल्या नगरसेवकांची नावे नोंदवण्याची जबाबादारी दिली. नावेही नोंदविली, आता या गैरहजर नगरसेवकांवर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.