Ulhasnagar Municipal Corporation : महायुतीत वाद, भाजपचा मोठा निर्णय, सत्तेतून बाहेर पडणार

Ulhasnagar Municipal Corporation : एकीकडे राज्यात  शिक्षक पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे

Ulhasnagar Municipal Corporation

Ulhasnagar Municipal Corporation : एकीकडे राज्यात  शिक्षक पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार, महायुतीत मोठा वाद निर्माण झाल्याने भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर पालिकेत (Ulhasnagar Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद वाढला आहे. या वादामुळे भाजपच्या स्थानिक समन्वय समितीने शिवसेना शिंदे गटाशी स्थानिक पातळीवर महायुती तोडण्याचा निर्णय घेत या संदर्भातील निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय निर्णय घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

उल्हासनगर पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र दोन्ही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे एकत्र आले होते. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे कमलेश निकम (Kamlesh Nikam) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जहरी टीका करत त्यांना  मंचेकर गँगचा ऑपरेटर म्हटलं होतं. यानंतर भाजपचे पदाधिकारी कपिल अडसूळ आणि मनीष हिंगोरा यांनी कमलेश निकम यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे उल्हासनगर पालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला आहे.

चंद्र, गुरू आणि मंगळ शुभ नक्षत्रात ; आज ‘या’ राशींना होणार फायदा –

सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पहिल्या महासभेपासूनच खटके उडताना दिसत आहे. उल्हास नदी घाटावरुन महापौर अश्विनी निकम यांचे पती व कलानी समर्थक कमलेश निकम यांनी भाजप नेते कुमार आयलानी यांना टार्गेट केले होते. यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत महापौरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता भाजपचे 4 ऐवजी 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 ऐवजी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्याने दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.

follow us