उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘कायदा हातात घेणा-यांचा…’

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘कायदा हातात घेणा-यांचा…’

Ajit Pawar On Ulhasnagar Firing: उल्हासनगरमध्ये पोलीस (Ulhasnagar Police) निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेण्याचे काही काम नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज धुळ्यात दिली आहे. उल्हासनगर मध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजपा आमदार वैतागलेल्या माणसासारखे तो बोलत होते, संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.

मात्र, त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असून, रात्री उशिरा त्याबाबत माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Devendra Fadnavis) यांनी धुळ्यात व्यक्त केली.

गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार

या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्याची माहिती आता समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube