सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्याप्रकरणी आव्हांडाविरोधात गुन्हा दाखल
A case has been registered against Jitendra Awhad for making offensive statements about the Sindhi community : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सिंधी समाजाबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी (Jamanu Puraswami) यांनी केली होती, त्यानंतर उल्हासनगर हिल लाइन पोलिस (Ulhasnagar Hill Line Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 मे रोजी उल्हासनगरमधील नेताजी चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.दरम्यान, ठाण्यातील सिंधी समाजाने एकजुटीने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी समाजाचे लोक राहतात. उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना आवाड यांनी सिंधी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सिंधी समाजाने केला आहे. याविरोधात ठाण्यात राहणाऱ्या सिंधी बांधवांनी कोपरी येथील शंकर मंदिरात एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
विखे कुटुंबीय आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ‘हॉटलाईन’ निळवंडेच्या पाण्यामुळे पुन्हा चार्ज
जितेंद्र आव्हाड हे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय सिंधी समाजाने घेतला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्यासह कोपरीतील सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान, आव्हाडांवर होत असलेल्या आरोपाविषयी ते म्हणाले की, माझ्या बद्दल सिंधी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.