Singham Again : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा खतरनाक लूक पाहिलात का?

Deepika Padukone New Look : ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील दीपिकाचा (Deepika Padukone) खतरनाक लूक बघायला मिळत आहे.   View this post on Instagram   A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone) बॉलिवूड सिंघम म्हणजेच […]

Deepika Padukone New Look

Deepika Padukone New Look

Deepika Padukone New Look : ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील दीपिकाचा (Deepika Padukone) खतरनाक लूक बघायला मिळत आहे.


बॉलिवूड सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटामध्ये ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि दीपिका पदुकोण ही दमदार जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. आता या चित्रपटातील दीपिकाचा खतरनाक लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ या सिनेमातील दीपिका पदुकोणचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका एकदम खतरनाक अंदाजात बघायला मिळाली आहे. डायरेक्टर रोहित शेट्टीने अभिनेत्रीचे अनेक रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

‘सिंघम अगेन’ चित्रपटातील दीपिकाचा लूक शेअर करत रोहितने सांगितले आहे की, “नारी सीता का भी रूप है और दुर्गा का भी…यए हमारी शक्ती शेट्टी…मेरी लेडी सिंघम..दीपिका पदुकोण”. रोहित शेट्टीने शक्ती शेट्टीला सर्वात खतरनाक पोलीस ऑफिसर असल्याचे सांगितले आहे. दीपिकाने या सिनेमातील पोस्टर शेअर करत सांगितले आहे की, “शक्ती शेट्टीची ओळख करून देत आहे.

BIGG BOSS 17: पॉवर कपल अंकिता अन् विकी जैनची बिग बॉस 17 मध्ये दमदार एंट्री

‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 2024 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार असल्याची चर्चा देखील रंगत आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची पहिली झलक सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेमध्ये ती चाहत्यांना बघायला मिळणार आहे. तर करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Exit mobile version