Sixth anniversary of ‘Srijan the Creation’ organization Open comedy skit competition held :
लेखक दिग्दर्शक अभिनेता राजेश देशपांडे ह्यांनी कोरोनाच्ग्या काळात जेव्हा सगळं जग ठप्प झालं होतं तेव्हा संकटात संधी ह्या न्यायाने नवोदित कलाकाराना योग्य शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळावं म्हणून सृजन द क्रिएशन ही ऑनलाइन कार्यशाळा सुरू केली. त्या कार्यशाळेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातून कलाक्षेत्रात करियर करू इच्छिणारे नवोदित कलाकार एकत्र आले आणि विविध उपक्रम करू लागले. आता ह्या संस्थेला अर्ध तप होत आहे.
गेल्या सहा वर्षात ह्या संस्थेच्या कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्मस स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार मिळवले. सृजन द क्रिएशन मधील अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट क्षेत्रात आपले कलागुण दाखवत आहेत. ह्या संस्थेचा येत्या १५ मे रोजी बोरिवली येथे सहावा वर्धापन सोहळा साजरा होणार आहे.
बॉलीवूडवर शोककळा! दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
त्या निमित्ताने सृजनोत्सव ह्या कार्यक्रमा अंतर्गत सृजन द क्रिएशनचे कलाकार विविध कलाविष्कार सादर करणार असून दिनांक १६ मे रोजी संध्याकाळी तिची शेवटची भेट आणि कॉफिन ह्या दोन दीर्घांकाचे प्रयोग होणार आहेत. आणि रविवारी १७ मे रोजी खुली स्किट (विनोदी प्रहसन) स्पर्धा घेण्यात येणार आहे . ह्या स्पर्धेत वय वर्षे ८ वरील हौशी आणि व्यावसायिक कलावंत भाग घेऊ शकतात.
वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी मालव्य योग; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
प्रवेश घेण्याची शेवटची तारीख २ मे आहे. आकर्षक पुरस्कार असलेल्या ह्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघानी खालील मोबाईल क्रमांकावर किंवा इमेल वर संपर्क साधावा. राजेश देशपांडे ९८२०१८०९७९ श्रद्धा माळवदे 9892808458 ईमेल srujanthecreation2019@gmail.com
