धक्कादायक! कोल्हापूरातही परतवाड्याची पुनरावृत्ती; मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींचं ब्लॅकमेलिंग

Muslim youths blackmail young women कोल्हापूरमध्ये मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे.

Muslim Youths Blackmail Young Women

Repeated cases of Paratwada in Kolhapur; Muslim youths blackmail young women by making videos : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आहे. या ठिकाणी देखील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी झालेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे.

बॉलीवूडवर शोककळा! दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यानंतर आरोपी शाहिद सदेला अटक देखील करण्यात आली आहे. तसेच त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शाहिद सनदे असं या आरोपी तरूणाचं नाव आहे. त्याने आठ ते नऊ तरुणींचे व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच हे व्हिडिओ त्याने आपल्या मित्रांना शेअर केल्याचे देखील उघड झालं आहे. मात्र त्याचा मित्र सध्या फरार असल्याचं समजत आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुलाची शिरोली म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी राहत असलेल्या हा आरोपी तरुण शाहिद सनदे त्याने आपल्या मैत्रिणींसोबत प्रेम संबंध निर्माण करून त्यांचे व्हिडिओ काढले आहेत. तसेच त्याने हे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर केले आहेत. ज्यावेळी या तरुणींना हा आरोपी ब्लॅकमेल करू लागला. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. तेव्हा या तरुणी पोलिसांमध्ये गेल्या.

वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी मालव्य योग; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

दरम्यान या प्रकरणावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाकडून निवेदन देण्यात आला आहे की, या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. हे प्रकरण जवळपास एक ते दीड महिन्यांपासून सुरू असल्याचे समजत आहे. त्यामुळे आज पुलाची शिरोली हे गाव पूर्णपणे बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो.

follow us