Sonam Kapoor Bought House With Her Own Money: स्टार प्लसवरील ‘इंडिया के टॉप 1%’ हा शो दर आठवड्याला प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. रंजक प्रश्न आणि जिओहॉटस्टारवरील ‘प्ले अलॉन्ग’च्या माध्यमातून हा शो कुटुंबीय आणि मित्रांना एकत्र खेळण्याची संधी देतो. त्यामुळे वीकेंडचा आनंद आणखी वाढतो. स्पर्धकांसोबत अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा मनमोकळा संवाद आणि त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से यामुळेही हा शो विशेष ठरत आहे. या आठवड्यात ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली या शोमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी महिलांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न आणि त्याचं महत्त्व यावर चर्चा करताना अनिल कपूर यांनी मुलगी सोनम कपूरने स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतून घर खरेदी केल्याचा किस्सा सांगितला.
जरांगेंवर टेंडर्सवरून आरोप करणारे बारस्करच अडचणीत; मालमत्ता खरेदीत गैरव्यवहारांचा आरोप
या भागात रुपाली गांगुली यांनी त्यांच्या ‘अनुपमा’ या मालिकेतील पात्राच्या स्वतःचं घर असण्याच्या स्वप्नाचा उल्लेख केला. त्या सांगतात की, प्रत्येक महिलेसाठी स्वतःचं घर असणं म्हणजे स्वावलंबन आणि आपलेपणाची भावना असते. रुपाली म्हणाल्या, “जगात एक असा कोपरा असावा, जो फक्त आपला असेल. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या कमाईतून, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं घर उभारावं. घर छोटंसं असलं तरी चालेल.”
रुपाली यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर अनिल कपूर यांना सोनमच्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस आठवले. सोनमने स्वतःच्या मेहनतीतून आणि बचतीतून घर खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं.
अनिल कपूर म्हणाले, “सोनमने स्वतःच्या पैशातून स्वतःचं घर घेतलं. मला तिच्यासाठी घर विकत घेण्याची गरजच पडली नाही. तिने स्वतःच्या मेहनतीने ते घर घेतलं.”
रणबीर कपूरही होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; घराची रेकी केल्याची माहिती
सोनमच्या करिअरच्या सुरुवातीबद्दल सांगताना अनिल कपूर पुढे म्हणाले, “ती सिंगापूरमधून शिक्षण घेऊन आली आणि भन्साळी साहेबांची असिस्टंट झाली. भन्साळी साहेबांनी तिला संधी दिली. तिने थोडे-थोडे पैसे जमा केले आणि स्वतःसाठी एक फ्लॅट खरेदी केला.”
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करत चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू केला. त्यानंतर 2007 मध्ये भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ चित्रपटातून रणबीर कपूरसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार, सोनमने आपल्या कमाईतून हळूहळू बचत केली आणि अखेर स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केला.
आजोबा-नातवाच्या नात्यातील गोडवा उलगडणार, ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित
‘इंडिया के टॉप 1% – द अनिल कपूर शो’ हा कार्यक्रम या वीकेंडला रात्री 8 वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.
