Sonam Kapoor : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आणि स्टाईल आयकॉन सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने नुकतेच एका प्रसिद्ध मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) (JLo) चा 2000 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये (Grammy Awards) घातलेला वर्साचेचा ग्रीन ड्रेस पुन्हा साकारला आहे. या लूकची अनेकदा चर्चा झाली असून, एमिली राताजकोव्स्की (Emily Ratajkowski) सारख्या हॉलीवूड (Hollywood) स्टार्सनी देखील या ड्रेसचा स्टाइलिश रिप्लिका केला आहे. मात्र, सोनम ही ड्रेस घालणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे.
एका लीक झालेल्या व्हिडीओमध्ये सोनमने आत्मविश्वासाने आणि जबरदस्त ग्लॅमरने फोटोशूट केले आहे. JLo ने जिथे ओपन हेअर्स आणि ग्लॉसी लूक ठेवला होता, तिथे सोनमने क्लीन बन आणि मिनिमल मेकअप करत पूर्ण लक्ष फक्त ड्रेसवर केंद्रित केले आहे. 2025 हे वर्ष सोनमसाठी अत्यंत खास ठरत आहे.
तिने Vogue India च्या कव्हरवर झळकून आपला दर्जा पुन्हा सिद्ध केला आहे. त्याचबरोबर ती पॅरिस फॅशन वीक आणि जपानमधील Dior च्या Pre-Fall Show मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसली आहे.
यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’चा धमाकेदार टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित