यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’चा धमाकेदार टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Saiyaara Teaser : भारतीय प्रेक्षकांना काही अविस्मरणीय लव्हस्टोरी देणाऱ्या यशराज फिल्म्स (YRF) चा आगामी चित्रपट ‘सैयारा’ या शुक्रवारी टीझरच्या (Saiyaara Teaser) रूपात आपली पहिली झलक दाखवणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांनी दिग्दर्शित केला असून प्रक्षेकांना लव्हस्टोरीचा गहिरा अनुभव देणार आहे.
सैयारा या चित्रपटामधून अहान पांडे (Ahaan Pandey) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यांच्या समवेत अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत आहे. अनीतने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राई मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी केली आहे.
चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रचार मोहिमेची सुरुवात 30 मे, शुक्रवार रोजी टीझर रिलीजने होणार असल्याची माहिती सैयाराच्या टीमकडून देण्यात आली आहे.
‘वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न…’, वडील अनिल कस्पटेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप