Sonam Kapoor: ‘मला बायको अन् गर्लफ्रेंडसुद्धा…’ सोनम कपूरच्या नवऱ्याची ‘ती’ कमेंट चर्चेत

Sonam Anand wedding anniversary: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह संपन्न झाला होता. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त (wedding anniversary) सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.   View this post on Instagram   A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor) या फोटोंच्या कॅप्शनमध्ये […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T162857.822

Sonam Kapoor

Sonam Anand wedding anniversary: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह संपन्न झाला होता. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त (wedding anniversary) सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.


या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने नवऱ्याला उद्देशून छोटेसे पत्र देखील लिहिले आहे. सोनमच्या लग्नाला जरी ५ वर्षे पूर्ण झाली असली, तरी देखील तिने या पत्रात ‘माझ्या आयुष्याची सुंदर ७ वर्ष’ असा उल्लेख केला आहे.


कारण, २०१८ मध्ये लग्नगाठ बांधण्याअगोदर सोनम आणि आनंदने एकमेकांना जवळपास २ वर्षे डेट करत होते. सोनम कपूर नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना तिने लिहिते आहे की, ‘आज आपल्या लग्नाचा वाढदिवस ! माझे नशीब चांगले म्हणून, तुझ्यासारखा प्रेमळ जोडीदार मला मिळाला आहे. ही माझ्या आयुष्यामधील सर्वात सुंदर असलेले ७ वर्षं होती.

या ७ वर्षांत आपल्या कधी देखील न संपणाऱ्या गप्पा, लाफ्टर, लॉंग ड्राईव्ह, एकत्र प्रवास, एकमेकांबरोबर घालवलेला वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला मुलगा वायू. हे सारे काही मी अनुभवले आहे. ‘लव्ह यू माय जान’… मी कायम तुझी गर्लफ्रेंड, तुझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बायको म्हणून कायम तुझ्यासोबत आहे. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी खूप सुंदर आहे.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

सोनमने केलेल्या या पोस्टवर पती आनंद आहुजाने मजेशीर कमेंट केली आहे. यात तो म्हणाला आहे की, मी आज एका मुलाचा बाप आहे आणि आज मला बायकोपण आहे आणि गर्लफ्रेंडसुद्धा… माझे नशीब! फरक एवढाच आहे की, या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. तुला खूप प्रेम सोनम….’ अशी कॉमेन्ट पती आनंद आहुजाने केला आहे.

Exit mobile version