Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष त्याच्यासोबत घडणाऱ्या अनुभवांमधून असो तो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं त्याचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
CM शिंदेंसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याचा ‘मुहूर्त’ ठरला; आमदार, खासदारही असणार सोबत!
अभिनेता आणि परोपकारी समाजसेवक सोनू सूदने द सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून एक अर्थपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. सोनूने त्यांची आई सरोज सूद यांच्या नावाने एक विशेष वृद्धाश्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प नक्कीच खास आहे. कारण जगातल्या किती तरी मातांना ही श्रद्धांजली आहे. मुले आणि पालक यांच्यातील मजबूत बंधन आहे. आपल्या सेवाभावी कार्यासाठी ओळखला जाणारा सोनू सूद ने या उपक्रमाद्वारे वृद्धांना आपलंसं केलं आहे.
Sonali Kulkarni : अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या पांढऱ्या पैठणीतील लूकवर चाहते फिदा
सरोज सेरेनिटीचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आरामदायक वातावरण तयार करणं आहे ज्यांची मुले विविध कारणांमुळे त्यांच्यासोबत राहू शकत नाही जिथे ते आनंदाने आणि सन्मानाने आणि प्रेमाने वाढू शकतात हा या मागचा हेतू आहे. सोनू सूद फाऊंडेशन कायम सकारात्मक भूमिका बजावत असताना हा नवा प्रकल्प समाजावर प्रभाव पाडणार आहे.
सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर सोनू सूद सायबर क्राइमवर आधारित ‘फतेह’ करत असून त्याच्या पहिल्या निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात हे पदार्पण असणार आहे. तर त्याच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे तो नेहमीच प्रेक्षक आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.