Download App

Sonu Sood: सोनू सूदला मिळाला एक नवा जिम पार्टनर; म्हणाला, ‘प्यारे मोहन…’

Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकवेळा त्याच्या विविध वक्तव्याने जोरदार चर्चेत असतो. सोनू गरीब लोकांना मदत करण्यात पुढे असतो. लॉकडाऊनच्या काळात सोनूने केलेली मदत सर्वांना माहितच आहे. सोनूला ‘गरीबांचा मसीहा’ असंही म्हणतात. मात्र आता सोनूला नवीन जिम पार्टनरची (GYM Partner) खास ओळख करून दिली आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ (video ) शेअर केला आहे.


यामध्ये तो हातात एक गोड पिल्लू घेऊन वर्कआउट करताना दिसत आहे. सोनूने याची ओळख ‘प्यारे मोहन…’अशी ओळख करून दिली असून हा खास जिम पार्टनर त्याचा जवळचा मित्र देखील आहे असं सांगितल आहे. या सगळ्यातून त्याने चाहत्यांना भटके कुत्रे पाळण्याचे आवाहनही केलं असून या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सूद एका खास अपंग चाहत्याशी मनापासून संभाषण करताना दिसला होता. जो अभिनेत्याला भेटण्यासाठी झारखंडहून मुंबईला आला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. सोनू सूद त्याचा आगामी ‘फतेह’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. जॅकलीन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकत.

Abhu Dhabi च्या आयफा उत्सवमसाठी रॉकस्टार डीएसपी सज्ज; प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार संगीतमय मैफिल

या चित्रपटाविषयी सांगायचे तर.. सोनू या सिनेमात ॲक्शन अवतारात दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझरचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात सून सूदशिवाय जॅकलीन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे सोनूनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे.

 

follow us