Abhu Dhabi च्या आयफा उत्सवमसाठी रॉकस्टार डीएसपी सज्ज; प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार संगीतमय मैफिल

Abhu Dhabi च्या आयफा उत्सवमसाठी रॉकस्टार डीएसपी सज्ज; प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार संगीतमय मैफिल

Rockstar DSP Ready for IIFA Utsavam in Abhu Dhabi : संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP ) आयफा उत्सवम ( IIFA Utsavam ) 2024 मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज होत आहे. हा खास सोहळा यास आयलंड अबू धाबी ( Abhu Dhabi ) येथे पार पडणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार या कार्यक्रमात त्यांच्या लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना त्यांना मंत्रमुग्ध करतील यात शंका नाही.

Tamanna Bhatia: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून राशीचं तोंडभरून कौतुक; म्हणाली, ‘खूप हॉट…’

कामाच्या आघाडीवर रॉकस्टार डीएसपीकडे यावर्षी प्रकल्पांच लाइन-अप आहे. DSP अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2: द रुल’, सुरियाचा ‘कंगुवा’, राम चरणचा पुढचा ज्याचे तात्पुरते नाव ‘RC 17’ आहे, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजित कुमार- या चित्रपटांमध्ये संगीताची चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. स्टारर ‘गुड बॅड अग्ली’, धनुषचा ‘कुबेरा’, विशालचा ‘रथनम’ आणि नागा चैतन्यचा ‘थंडेल’ या साठी देखील तो तयारी करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Devi Sri Prasad (@thisisdsp)

सगळं त्यांनी केलं तर आम्ही 35 वर्षात काय केलं? अजित पवारांचा पुतण्याला टोला

याच दरम्यान देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. पुष्पाच्या संगीतासाठी रॉकस्टार डीएसपी यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. कारण त्यांचं संगीत म्हणजे संपूर्ण चित्रपट बांधून ठेवणारा महत्त्वाचा भाग असतो. त्यांचं संगीत चित्रपटाच्या विषयाला तंतोतंत जुळणार असतं. त्याची मधूरता प्रेक्षकांच्या मनात खोलवर रूजते. त्यांना चित्रपटाशी जोडून ठेवते. त्यामुळे चाहते या चित्रपटाची आणि गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us