पृथ्वी शॉ पहिल्यांदाच दिसला गर्लफ्रेंड निधीसोबत, IIFA अवॉर्ड शोमध्ये झाले होते सहभागी

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 05 27 At 3.04.35 PM

आयपीएलच्या 16 व्या हंगामात, जर एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीमुळे सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागले असेल तर तो दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) खेळाडू पृथ्वी शॉ होता. आता लीग स्टेजसह संघाचा प्रवास संपल्यानंतर, शॉ पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसला आहे. 26 मे रोजी अबू धाबी येथे आयोजित आयफा अवॉर्ड शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पृथ्वी शॉची मैत्रीण निधी तापडिया एक मॉडेल असून तिला अभिनयात करिअर करायचे आहे. या कार्यक्रमात दोघेही काळ्या कपड्यात दिसले. जिथे पृथ्वी शॉने जॅकेट आणि शर्टसोबत काळ्या रंगाची जीन्स घातली होती. तर निधीने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होते.

पृथ्वी शॉसाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला राहिला नाही

दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असलेल्या पृथ्वी शॉसाठी, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट आयपीएल हंगाम आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे, शॉला संघ व्यवस्थापनाने काही सामन्यांनंतर प्लेइंग 11 मधून वगळले. मात्र, हंगामाच्या शेवटी शॉला काही सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याला पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळता आली.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

या हंगामात 23 वर्षीय पृथ्वी शॉ 8 सामन्यात केवळ 106 धावा करू शकला. शॉचा खराब फॉर्म पाहता भारतीय संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी सोपे नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत काही युवा खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांची नावे आघाडीवर आहेत.

Tags

follow us