सगळं त्यांनी केलं तर आम्ही 35 वर्षात काय केलं? अजित पवारांचा पुतण्याला टोला

सगळं त्यांनी केलं तर आम्ही 35 वर्षात काय केलं? अजित पवारांचा पुतण्याला टोला

Ajit Pawar On Rohit Pawar : लोकसभेचा प्रचार (Lok Sabha Campaign) आता शिगेला पोहोचत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

2024 ची लोकसभा निवडणूक नणंद विरुद्ध भावजयची नसून राहुल गांधी (Rahul Gandhi)  विरुद्ध नरेंद्र मोदीची (Narendra Modi) आहे असं अजित पवार म्हणाले. याच बरोबर जर सगळं काही साहेबांनी केल, मग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं? असा सवालही अजित पवारांनी विचारला. आज माझ्यावर अनेक आरोप केले जात आहे मात्र मला त्यांच्या आरोपामुळे काय भोकं पडत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीची जनता मला ओळखते. असं देखील अजित पवार म्हणाले.

चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले, जेव्हा तुम्ही मला खासदार केला तेव्हा याचा जन्म झाला होता आणि तो आज सांगतो हे सगळं साहेबांनी केल, मग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं, असं सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाषणात बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या लग्नापासून ते राजकारणात कसे आले याचा इतिहास सांगितला. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा बंगल्यांवर शरद पवार यांच्याकडे बारामतीतील काही जणांनी बारामतीमधून अजित पवार यांना तिकीट द्या अशी मागणी केली तेव्हा शरद पवार यांनी मी राजकारण सोडून काटेवाडीला जातो, असे म्हणाले होते, असा दाखला देत त्यांनी त्यांच्या राजकारण झालेल्या प्रवेशाबद्दल सांगितले.  यानंतर त्यांनी बारामती मतदारसंघात केलेल्या विकास कामांबद्दल माहिती देत त्यांनी येणाऱ्या काळात बारामतीच्या विकासासाठी भावनिक होऊन मतदान न करण्याचा आणि आपल्या विचारांचा खासदार निवडण्याचे आवाहन मतदारांना केला.

माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

शरद पवार यांच्यावर टीका करत अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासबोत दिल्लीला जातो, आम्ही तिकडे गेल्यानंतर माझी मोदींजींसोबत ओळख झाली. तसेच अदानी – अंबानी यांच्यासबोत ओळख झाली मात्र यापूर्वी आमची त्यांच्यासबोत ओळख नव्हती आम्ही फक्त घास घास घासाचयं, पण मोठी लोकं यायची अन् ह्यांनी केलं, ह्यांनी केल.. असं व्हायच आणि ते निघूनही जायच, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. आता अजित पवार यांच्या या टीकेला शरद पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिला जातो हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube