‘सूनेला निवडून द्या, आता सुनेचे दिवस…’; अजित पवारांचा शरद पवारांना धाराशिवमधूनही टोला
Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण
घरातले पवार आणि बाहेरच पवार वेगळे, असं वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांवर अजित पवार गटाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता अजित पवार शरद पवारांना लक्ष केलं. आज धाराशिवमध्ये अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करतांना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, धाराशिवकरांनी आधी पद्मसिंह पाटलांना निवडून दिलं. आता अर्चना पाटलाना निवडून द्या. म्हणजे आधी सासऱ्याला निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. चार दिवस सासूचे असतात. आता सुनेचे दिवस आलेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांना चिमटा काढला.
माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय आहे? विखेंचा विरोधकांवर घणाघात
ते म्हणाले, सून ही आपल्या घरची असते. सुनेला केव्हाही परकी म्हणून हिनवायचे नसते. पण, काहीजण तिला बाहेरची म्हणून हिणवतात. याचा विचार माता भगिनींनी केला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
एका सभेत अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत पवार साहेबांना मत दिल. मला आणि सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सूनेला मतदान करायचं, ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल, त्या ठिकाणी मतदान करा, असं ते म्हणाले होते. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचे मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असे शरद पवार म्हणाले.