Download App

Sonu Sood: चाहत्यांकडून सोनूला मिळालं अनोखं गिफ्ट, ‘थेट 1500 किमी धावत आला आणि…’

Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.

Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो. सोनू गरीब लोकांना मदत करण्यात पुढे असतो. लॉकडाऊनच्या काळात सोनूने केलेली मदत सर्वांना माहितच आहे. सोनूला ‘गरीबांचा मसीहा’ (Garibacha Masiha) असंही म्हणतात. सोनू सहसा राजकीय वातावरणावर मतं व्यक्त करणं टाळतो. परंतु नुकतंच महेश नावाच्या चाहत्याने फतेह अभिनेत्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीने गिफ्ट दिला.

अभिनेत्याला अनोखा गिफ्ट देण्यासाठी महेश दिल्ली ते मुंबई धावत आला असून 1500 किमी अंतर तो सोनूसाठी धावत आला आणि त्याची भेट घेतली आहे. सोनू सूदच्या अनेक चाहत्यांनी इंटरनेटवर सोनू सूद आणि त्याच्या चाहत्याच्या कृतीवर प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले की, “Respect fr his”, तर दुसऱ्या आणखी एका चाहत्याने “सोनू सूद हा खरा हिरो आहे, अशा कॉमेंट्स होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता कामाच्या आघाडीवर सोनू सूद त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपट ‘फतेह’साठी तयारी करत आहे. यामध्ये तो जॅकलिन फर्नांडिससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. सूदच्या शक्ती सागर प्रॉडक्शनद्वारे निर्मित, सायबर क्राईम थ्रिलर हॉलिवूडच्या कलाकारांच्या बरोबरीने असल्याचे वचन देतो. ॲक्शनर लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे.

Panchayat 3 Release Date: ‘पंचायत 3’च्या रिलीज डेटविषयी चाहते नाराज; म्हणाले, ‘तुम्ही लोकांची…’

दरम्यान, सोनू सूद लवकरच एका अनोख्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘फतेह’ या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. सायबर क्राइमवर हा सिनेमा असून या सिनेमात जॅकलिन फर्णांडिस आणि विजय राज मुख्य भूमिकेत असणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज