Sony Entertainment Television New Show Aami Daakini : ‘आहट’सारख्या गाजलेल्या शोने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या Sony Entertainment Television कडून येतोय एक नवीन थरारक प्रवास –‘आमी डाकिनी’. ‘आमी डाकिनी’ (Aami Daakini) ही एक अशी प्रेमकथा आहे, जी काळाच्या आणि जन्मांच्या मर्यादा ओलांडते. डाकिनीला ( Sony Entertainment Television) तिचं हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवायचं आहे. पूर्वजन्मातलं तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी ती परत येते – काळाच्या पार, मृत्यूच्या पलिकडून. बाहेरच्या जगाला ती भूतकाळाची एक सावली वाटेल, पण तिच्यासाठी हा पुनर्जन्म म्हणजे अपूर्ण राहिलेलं प्रेम पूर्ण करण्याचा प्रयत्न.
या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे डाकिनी – मोहक, रहस्यमय आणि ठाम. आपल्या हरवलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. तिचं प्रेम आणि तिची आसक्ती यामधली सीमारेषा हळूहळू अस्पष्ट होऊ (Entertainment News) लागते. सौंदर्य आणि संहार यामध्ये फरकच उरत नाही. तिच्या मार्गात येणाऱ्याला जगणंही नशिबात नसेल.‘आमी डाकिनी’ या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ थरारक अनुभव नव्हे, तर त्यात गुंफलेली भावनिक खोली.
मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’
शीन दास या प्रतिभावान अभिनेत्रीने डाकिनीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक भूमिका ठरणार आहे. डाकिनीविषयी बोलताना शीन म्हणते, “ही भूमिका माझ्यासाठी पूर्णतः वेगळी आणि गूढ आहे. डाकिनी ही एक तीव्र भावभावनांनी भरलेली व्यक्तिरेखा आहे – शक्तिशाली, निर्भय आणि कुणाचीही पर्वा न करणारी. तिला साकारताना अनेक भावनिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावं लागलं. कधी धडकी भरवणारे क्षण होते, कधी अंतर्मनात खोल उतरावे लागले. प्रेक्षक तिच्या अप्रत्याशित स्वभावाने आणि तिने निर्माण केलेल्या गूढ, धक्कादायक जगात नक्कीच हरवून जातील. ही मालिका म्हणजे एक भावनिक आणि थरारक झेप आहे.”
अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी
थरार, भावना आणि हलकीशी भीती यांचं परिपूर्ण मिश्रण असलेली ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांसाठी एक दृश्य आणि भावनिक मेजवानी ठरेल. ‘आमी डाकिनी’ पाहायला विसरू नका – 23 जूनपासून, सोमवार ते शुक्रवार, रात्री आठ वाजता, फक्त Sony Entertainment Television आणि SonyLIV वर.