CID मध्ये नवा ट्विस्ट! अभिजीतने दयाला का मारलं? प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली

CID मध्ये नवा ट्विस्ट! अभिजीतने दयाला का मारलं? प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली

Why did Abhijit kill Daya In CID : सगळ्यांचा आवडता CID शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे. त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला (CID) येणार आहेत. ही बातमी ऐकून प्रेक्षक आनंदले आहेत. हा शो अभिजीत आणि दयाच्या मैत्रीसाठी देखील खूप प्रसिद्ध होता. परंतु प्रोमोत दिसतंय की, अनेक वर्षांची मैत्री विसरत अभिजीतने दयावर गोळ्या (Why did Abhijit kill Daya) झाडल्या. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या नव्या सीझनविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झालीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

तब्बल 6 वर्षांनंतर सीआयडी शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नव्या ट्विस्टसह पाहाता येणार आहे. यंदाच्या भागात शोमध्ये प्रेक्षकांना अनेक नव्या गोष्टी अनुभवायला मिळणार (Abhijit kill Daya In CID) आहेत. पहिल्यांदा 1998 मध्ये सीआयडीचा पहिला एपिसोड स्ट्रिम झाला होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी ‘सीआयडी’ने चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी शो बंद केल्यानंतर आता पुन्हा सुरू होत आहेत. शोचा प्रोमो सोनी टीव्हीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलाय.

आंतरवाली सराटीत नेमकं घडतंय काय? माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार खासदार अन् जरांगे पाटलांमध्ये मध्यरात्री खलबतं

प्रेक्षक आपल्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत करत असल्याबद्दल निर्मात्यांना धन्यवाद देत आहेत. पण या प्रोमोमध्ये एक अनपेक्षित आणि अविश्वसनीय खोच आहे. एके काळी जिवलग दोस्त असणारे अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत. जे देशासाठी नेहमी एक होऊन लढले आहेत ते आज शत्रू बनून एकमेकांसमोर का उभे आहेत? अभिजीतने दयाला का मारले? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहे. अभिजीतने दयाला का मारलं? हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. याचं रहस्य आपल्याला सीआयडीच्या ट्रेलरमधून उलगडणार आहे.

उद्धव ठाकरेंना धक्का! तिकीट वाटपानंतर बडनेरात नाराजी उफाळली; प्रिती बंड अपक्ष लढणार

प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम म्हणतात की, मालिकेच्या या नवीन भागात दया आणि अभिजीत यांची जोडी तुटली आहे. आता हे दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. यामुळे CID चा पायाच हलून गेला आहे. ACP प्रद्युमनचे विश्व उलट-पालट होणार आहे. सहा वर्षांनी पुन्हा ACP प्रद्युमन म्हणून परत येणे स्वप्नवत वाटते आहे. या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम मिळाले आहे. आम्ही प्रेक्षकांना रहस्य आणि हृदयाची धडधड वाढवणाऱ्या नाट्याने भरलेली थरारक सफर घडवण्याची हमी देतो. CID लवकरच परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर! अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube