Abhijit Khandkekar: अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारली ‘पत्रकाराची भूमिका’
Abhijit Khandkekar New Web Series: अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) हा मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मालिका असो वा सिनेमा, तो कायम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. सोशल मीडियावर (Social media) सक्रिय राहतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो.
अभिनेता अभिजीत खांडकेकरची आता ‘दुरंगा’ या वेब सीरिजचे (Web Series) दुसरे पर्व 24 ऑक्टोबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. झी 5 वरील ही सीरिज कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’ वरून (Flower of Evil) हिंदीमध्ये बनवण्यात आली आहे. पहिल्या सीझनचे प्रीमियर 19 ऑगस्ट 2022 दिवशी झाले होते. याच्या दोन्ही पर्वात गुलशन देविया, दृष्टी धामी, अमित साध, अभिजीत खांडकेकर यांच्या भूमिका आहेत.
मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकरने यामध्ये विकास सरोदे नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील त्याच्या सर्वात कठीण सीनविषयी बोलत असताना अभिजीत ‘डीएनए’ला म्हणाला, “पहिल्या सीझनमध्ये एक सीन आहे, जिथून सर्वकाही सुरू होतं. मी अभिषेकच्या (गुलशन देविया) वर्कशॉपमध्ये त्याला भेटण्यासाठी जातो आणि अभिषेक मला पकडतो आणि माझे अपहरण करतो.
View this post on Instagram
परंतु या सीनचे आम्ही तसे सराव केले नाही, अभिषेकने मला मागून पकडले आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही दोन-तीन वेळेस सराव केल्यावर, गुलशन आणि मी दोघेही सीनबद्दल खूपच गंभीर आणि सावध होतो. परंतु तरी मी थोडा गुदमरलो होतो. यामध्ये कोणाचाही दोष नव्हता, पण त्या क्षणी आम्ही दोघेही इतके भूमिकेत शिरलो होतो की मी बेशुद्ध पडेन असं वाटलं होतं.
बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण
दरम्यान, ‘दुरंगा’ या सीरिजच्या पहिल्या पर्वाप्रमाणे दुसऱ्या पर्वाचं देखील मोठ्या प्रमाणात तोंडभरून कौतुक होत आहे. कलाकारांची त्यांच्या भूमिका उत्तम पद्धतीने केल्या आहेत. या सीरिजचं दुसरं पर्व तिथून सुरू होतं, जिथे पहिलं पर्व संपलं होतं. ‘दुरंगा 2’ सीरिजचे आठ एपिसोड आहेत. पहिल्या भागात जो थरार आणि सस्पेन्स होता तो यावेळीही कायम ठेवण्यात आला आहे. ही सीरिज प्रेक्षकांना झी 5 वर लवकरच बघता येणार आहे.