Abhijeet Khandkekar Birthday: रेडिओ जॉकी, निवेदक अनेक रूपांचा एक चेहरा अभिनय विश्वात कसा आला? पाहा…

Abhijeet Khandkekar Birthday: रेडिओ जॉकी, निवेदक अनेक रूपांचा एक चेहरा अभिनय विश्वात कसा आला? पाहा…

Happy Birthday Abhijeet Khandkekar: अभिनेता अभिजीत खांडकेकर हा मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून त्याला ओळखला जात असतो. (Abhijeet Khandkekar Birthday) मालिका असो किंवा चित्रपट, तो कायम आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना…, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navryachi Bayko) या सिरीयलमधून तो चाहत्यांच्या घराघरांत पोहोचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)


आज (७ जुलै) अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आपला वाढदिवस साजरा करत आहे. तो मुळचा पुण्याचा असलेला अभिजीत आता मनोरंजन विश्वात चांगलंच वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून येत आहे. परंतु अभिजीतने त्याच्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून आजिबात केली नव्हती. अभिजीत खांडकेकर याचा जन्म ७ जुलै १९८६ रोजी पुण्यात झाला आहे. यानंतर त्याचे शिक्षण पुण्यात पूर्ण झाले आहे. अभिजीतने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आणि मनोरंजन क्षेत्रात पुढे करियर करण्याचा निर्णय घेतला होता. आवाज आणि निवेदन शैलीवर त्याचे चांगलेच प्रभुत्व होते.

त्यामुळे अभिजीतने रेडिओ जॉकी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या दरम्यान त्याचा अनेक कलाकारांशी संपर्कात येऊ लागला होता. यातूनच त्याच्यातही अभिनयाची चांगलीच गोडी निर्माण झाली होती. आता त्याची पावलं देखील अभिनयाची वाट धरू लागली आहेत. काळामध्ये एका लोकप्रिय चॅनेलने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. अभिजीत खांडकेकरने देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याला अभिनेता म्हणून चांगलंच नावारूपास आणले होते.

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेत टॉप ६ पर्यंतच तो पोहचला होता. या कार्यक्रमातून तो बाहेर पडल्यानंतर २०१० मध्ये त्याला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या सिरीयलची मोठी ऑफर आली होती. या सिरीयलमधून अभिजीत रोमँटिक हिरो बनून प्रत्येक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करू लागला.या सिरीयलमध्ये अभिजीत-शमिका ही जोडी चाहत्यांना खूपच आवडली होती. या सिरीयलमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानीस प्रमुख भूमिकेत दिसून आली होती.

या सिरीयलनंतर अभिजीत खांडकेकरने अनेक शो होस्ट केले आहेत.अनेक कार्यक्रमामध्ये त्याने निवेदनाची धुरा सांभाळली असल्याचे दिसून आले आहे . यानंतर पुन्हा एकदा तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरीयलमधून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिरीयलमध्ये त्याने साकारलेले ‘गुरुनाथ’ हे पात्र चाहत्यांना चांगलंच आवडले होते. सध्या अभिजीत खांडकेकर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या सिरीयलमध्ये ‘मल्हार’ हे पात्र साकारत आहेत, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube