सीआयडी नेमकं काय करतंय ? माझ्याकडे नवीन माहिती; रोहित पवार पुन्हा आक्रमक

Rohit Pawar-28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे.

  • Written By: Published:
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Accident Death Inquary

Rohit Pawar On Ajit Pawar death: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar : अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?) यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सरकारी यंत्रणा आणि अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान कंपनीबाबत रोहित पवारांना संशय आहे. त्यामुळे या विमान कंपनीबाबत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.


बागेश्वर बाबांना झाली उपरती! छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मागितली माफी

अजितदादांच्या अपघाताला परवा तीन महीने होत आहेत. मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाही, CID नेमकं काय करतंय हे देखील कळायला मार्ग नाही, नाही, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे. तसंच माझ्याकडं आलेली नवीन माहिती आणि कागदपत्रं सीआयडीकडे सादर करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

संजू सॅमसनचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम; या दिग्गजांना टाकले मागे !

अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला 2 महिन्याहून अधिकचा कालावधी झाला आहे. केंद्रीय गृहमंत्र्याना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला एक महिना लोटला असून काहीही कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य जनतेत याविषयी प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्रीसाहेब मोठे नेते असल्याने कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील आता निवडणूका देखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या दहा दिवसांत सीबीआय तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल, ही अपेक्षा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवारांच्या मनातही शंका
बारामती पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघाताबाबत माझ्या मनात शंका असल्याचे म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभेत अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे. कोणी दोषी असल्यास सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

follow us