बागेश्वर बाबांना झाली उपरती! छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मागितली माफी

छत्रपती संत महंतांना किती मानायचे हे मला सांगायचे होते. आम्ही हिंदू राष्ट्राची विचारधारा त्यांच्याकडूनच घेतलीय.

News Photo   2026 04 26T191208.898

सध्या देशभरात बागेश्वर बाबांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधानावरुन संताप व्यक्त केला जातोय. शिवरायांबद्दल अपमानजनक विधान केल्याने बागेश्वर यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, बागेश्वर बाबांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. भारतदुर्गा मंदिरच्या शिलान्यास कार्यक्रमावेळी बागेश्वर बाबांच्या वक्तव्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासकडे जाऊन म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो आता हे राज्य तुम्हीच सांभाळा…काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही, असं बागेश्वर बाबा म्हणाले, ज्यावर आता राजकीय वर्तुळातून काही नेत्यांनी नाराजीचा तीव्र सूरही आळवल्याचं पाहायला मिळाला होता.

वादग्रस्त विधान काय होते?

आज भारतीय सनातनी परंपरेत जन्म घेतल्याचा अधिक आनंद आपल्याचा होत असल्याचं म्हणताना, ते पुढे म्हणाले, ‘शिवाजी युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासांकडे जाऊन म्हणाले, आपण खुप युद्ध लढलो; आता हे राज्य तुम्हीच सांभाळा…काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही… समर्थ रामदास यांनी राज्य मी चालवणार मात्र आदेश तुमचा असेल सांगितलं.’

बागेश्वर बाबांचा दावा

ऐतिहासिक प्रसंगाबाबत दावा करताना विस्तारीत स्वरुपात ते म्हणाले, ‘शिवबांच्या बोलण्यानंतर स्मित करत समर्थ रामदास म्हणाले ठीक आहे, आम्हाला स्वीकार आहे. पण, तुम्ही आमचे कोण आहात? यावर उत्तर देत शिवबांनी आपण त्यांचे शिष्य असल्याचं म्हटलं. त्यावर रामदासांनी प्रश्न केला, शिष्याचं कर्तव्य काय? गुरुच्या आज्ञेचं पालन करणं असं उत्तर शिवाजी महाराजांनी दिलं’. ‘ज्यानंतर रामदासांनी महाराजांनी त्यांना सोपवलेलं मुकूट महाराजांच्या डोक्यावर ठेवलं आणि आपण राज्य चालवू मात्र त्याचं संचालन तुम्ही करायचं असं सांगितलं’, असा दावा बागेश्वर यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज युद्धात थकले अन् त्यांनी रामदास स्वामींच्या पुढे; बागेश्वर बाबांचं आणखी एक वादग्रस्त विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, बागेश्वर धाम धिरेंद्र कृष्ण शास्त्री, स्वामी अवदधेशानंद गिरीजी महाराज, गुरुशरणानंद महाराज, मित्राननंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा यांचीसुद्धा उपस्थिती होती.

बागेश्वर बाबांचा माफीनामा

कालपासून सोशल मीडियावर माझे विधान वेगळ्या पद्धतीने घेतले. आम्ही ज्यांच्याकडे पाहून हिंदु राष्ट्राची संकल्पना केली. आम्ही त्यांचा अपमान करु शकत नाही. स्वप्नातही याचा विचार करु शकत नाही. देशातील हिंदू आज जिवंत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. मराठा साम्राज्य हे आपलेच आहेत. आम्ही सर्व छत्रपतींना मानतो. 1 टक्केदेखील माझं अपमान करण्याचा विचार नव्हता. माझं बोलणं गुरुंचा महिमा सांगणारे होते.

छत्रपती संत महंतांना किती मानायचे हे मला सांगायचे होते. आम्ही हिंदू राष्ट्राची विचारधारा त्यांच्याकडूनच घेतलीय. साधू कोणाची निंदा करु शकत नाही. ज्यांची वीरता पाहून आम्ही आमचे चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अवमान होऊ शकत नाही, असे बागेश्वर बाबांनी म्हटले. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असेही ते म्हणाले.

follow us

संबंधित बातम्या