अंजनगाव खेलोबातील तणाव निवळला! शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णयानंतर तोडगा निघाला

Anjangaon Kheloba मध्ये शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर अखेर खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

Anjangaon Kheloba

Tensions eased in Anjangaon Kheloba solution reached after decision to move statue of Chhatrapati Shivaji Maharaj : अठरा पगड जाती सोबत घेत शत्रूंविरोधात लढत स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानले जाते . मात्र सोलापुर जिल्ह्यातल्या अंजनगाव खेलोबामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून आता थेट मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला होता. मात्र अखेर हा वाद मिटला आहे. शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर अखेर खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

धक्कादायक! दिंडोरीमध्ये स्नेहसंमेलनाहून परतताना कार विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू

या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, पोलीस अधिकाऱ्यांसह मोहोळची माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एक यशस्वी तोडगा निघाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली ही जागा खेलोबा देवस्थानची असल्याच्या मुद्द्यावर दोन्ही समाजाचं एकमत झालं. या पुतळ्याच्या स्थलांतर देखील करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजाकडून आता हा पुतळा बसवण्यासाठी जागा निश्चित केली जात आहे.

दोन जातींमध्ये पेटलेल्या या वादाची नेमकी पार्शवभूमी काय आहे ?

सोलापूर जिल्ह्यातील माढामधील अंजनगाव खेलोबामध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वादाला तोंड फुटलं. अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिरा जवळ बसवला आहे. सदर जागा देवस्थानची असल्याचे म्हणत धनगर समाजाने पुतळा बसवण्यावर आक्षेप घेतला. तर हि सरकारी जागा असल्याचे म्हणत शिवप्रेमी देखील आक्रमक झाले हेच या वादाचे मूळ कारण ठरले .

राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

खेलोबा देवस्थानाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. यामुळं धनगर समाज आक्रमक झाला व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत रात्री पोलिसांनी पुतळा काढण्याची तयारी केली. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमी आक्रमक झाले. यावेळी दोन्ही गट भिडले व जमा झालेल्या जमावाकडून दगडफेक झाली. शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वादला आता राजकीय वळण लागू राहिले आहे.

follow us