धक्कादायक! दिंडोरीमध्ये स्नेहसंमेलनाहून परतताना कार विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू

Car falls in well नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणी शाळेच्या स्नेहसंमेलन परतत असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे.

Car Fall In Well

Car falls in well while returning from a gathering in Dindori, 9 members of same family die on the spot : नाशिकच्या दिंडोरी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी शाळेच्या स्नेहसंमेलन परतत असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कार कोसळल्याने हे दुर्घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनून हे सर्व जण परत येत असताना हे दुर्घटना घडली.

राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

या अपघातामध्ये इंदुरी गावांमधील दरडोरे कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता सांगताच तीन फुट अंतरावर असलेली विहीर याचा अंदाज अपघात घडल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे ही कार विहिरीमध्ये कोसळली. दिंडोरी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात यश आला आहे. मात्र एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान येथील स्थानिक यावर संताप व्यक्त करत आहे.

जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर करायलाच हव्या या 5 चाचण्या अन्यथा…

त्यावर बोलताना स्थानिक म्हणाले की या अगोदर देखील या विहिरीमध्ये अनेकदा अशा दुर्घटना झाल्या आहेत. मात्र ज्या कुटुंबाची ही विहीर आहे. त्यांच्याकडून अद्यापही या विहिरीला संरक्षण कठडा करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. त्यांनी त्यांच्या घरासाठी संरक्षण गेट केलेले आहे. मात्र विहिरीमध्ये अनेकांचा मृत्यू होऊन देखील त्यांनी काही वाटत नाही. असं म्हणत या मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

follow us