जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर करायलाच हव्या या 5 चाचण्या अन्यथा…
woman तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टेस्ट 25 ते 45 वया दरम्यानच्या महिलांन करणे गरजेचे असते. कोणत्या आहेत या टेस्ट जाणून घ्या सविस्तर....
If you are a woman between the ages of 25 and 45, then these 5 tests are a must-have, otherwise : गेल्या वेळी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी हेल्थ चेकअपचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर हा मुद्दा खरच किती महत्त्वाचा आहे यावर विचार होऊ लागला आहे… त्यात महिलांनी तर कायम आपल्या शरीरामध्ये होणारे बदलांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामध्ये तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टेस्ट आहेत ज्या 25 ते 45 वया दरम्यानच्या महिलांनी वेळोवेळी करणे गरजेचे असते. कोणत्या आहेत या टेस्ट जाणून घ्या सविस्तर….
जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचे आहे. कारण या वयामध्ये शरीरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होतात. त्यामुळे शरीराची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. जेणेकरून संभाव्य आजारांचे धोके टाळता येतात. आपल्यापैकी बऱ्याच जणी ह्या केवळ काही गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात. मात्र नियमित हेल्थचेक करून घेणे जास्त गरजेचं असतं. ज्यामध्ये तज्ज्ञ सांगतात की, काही महत्त्वाच्या चाचण्या तुम्ही करणे गरजेचे असत त्या कोणत्या पाहूयात….
यातील पहिली चाचणी आहे ती म्हणजे बोन डेंन्सीटी टेस्ट या चाचणीमध्ये तुमच्या हाडांची ताकद आणि कॅल्शियमचे प्रमाण तपासले जाते. यातून ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांच्या कमजोरीची माहिती समोर येते. तसेच वेळेत ही चाचणी केल्याने लवकर तुमच्या हाडांच्या समस्या समजतात आणि त्यावर गंभीर आजार होण्याच्या अगोदर उपाय करता येतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लीमेंट्स किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करता येऊ शकतो.
दुसरी चाचणी आहे ती म्हणजे पॅप टेस्ट ही चाचणी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतामध्ये देखील गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या चाचणीतून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याच्या पूर्व अवस्थेतच ओळखता येतो. त्यामुळे प्रत्येक महिलेला ही चाचणी नियमितपणे करणं अत्यंत गरजेचे आहे. ही चाचणी वयाच्या 21 वर्षांनंतरच वेळोवेळी करणे गरजेचे असते
कोलेस्ट्रॉल लेवल ही तपासणी केली की, त्यामध्ये हृदयरोग स्ट्रोक आणि ब्लड वेसल्स यासारख्या समस्या समोर येतात. तसेच हाय कोलेस्ट्रॉल हे धमन्यांमध्ये प्लाक जमा करू शकते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. तसेच तुम्हाला वेळेत कोलेस्ट्रॉल लेवल कळाली तर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल व्यायाम आणि काही आवश्यक औषधे देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकता
त्यानंतर सर्वात महत्त्वाची चाचणी आहे ते म्हणजे थायरॉईड फंक्शन टेस्ट यामध्ये शरीरातील थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण तपासले जातात थायरॉईडचं असंतुलन झालं शरीरामधील वजन वाढणे किंवा वजन कमी होणे थकवा केस गळणे आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी ही चाचणी करत राहिल्यास त्यातील असंतुलन लक्षात आल्याने त्यावर आजार होण्याच्या आधी उपचार करण्यास मदत होऊ शकते. सध्या महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्येचं प्रमाण वाढलं आहे.
तसेच किडनी आणि लिव्हर फंक्शन टेस्ट ही तेवढीच महत्त्वाचे आहे यातून शरीराच्या महत्त्वाच्या भागाची कार्यक्षमता तपासले जाते. म्हणजे तुमच्या किडनीतून विषारी पदार्थ बाहेर पडत आहेत की नाही. तुमच्या लिव्हरचं आरोग्य किंवा फॅटी लीवर या समस्यांची माहिती मिळते जेणेकरून भविष्यातील गंभीर आजाराचा धोका टाळता येतो. मात्र या सर्व चाचण्या करताना अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर एक आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी होता.