बागेश्वर महाराजांच्या सत्संगावरून परतले अन् सर्व कुटुंबानेच आत्महत्या केली; वाचा, नक्की काय घडलं?

Family Suicide : एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. (Suicide) पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाच पाऊस त्यांनी उचललं असं बोलल जातय.
प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथील सकेत्रीनजीक भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. प्रवीण मित्तल हे भंगाराचा व्यवसाय करायचे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या प्रवीण मित्तल यांनी कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना गाडीतून सापडलेल्या दोन पानी चिठ्ठीतून सगळा तपशील समोर आला आहे.
वीस लाख हुंड्यासाठी छळवणूक; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर
पंचकुला येथील सेक्टर 27 मध्ये मंगळवारी रात्री एक कार स्थानिकांच्या नजरेस पडली. लोकांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा गाडीत अनेक लोक बसले होते. ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस शुद्धीत होता. या व्यक्तीने लोकांना सांगितले की, आमच्यावर खूप कर्ज होते, त्यामुळे आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी लोकांनी लगेच प्रवीण मित्तल यांच्यासह सगळ्यांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सहा जणांना रुग्णालयात आणताच मृत घोषित केले. तर, प्रवीण मित्तल यांचा काहीवेळाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना सगळ्यांना सामूहिक आत्महत्या केली.
मित्तल कुटुंबावर 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. बँकेने त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. मात्र, कर्जाचा बोझा वाढल्याने त्यांनी जगणेही मुश्कील झाले होते. प्रवीण मित्तल हे एक बडे भंगार व्यावसायिक होते. एकेकाळी मित्तल कुटुंबाने स्वत:चा कारखाना, गाडी, फ्लॅट अशाप्रकारचे ऐषोरामी जीवन जगले होते. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे मित्तल यांचा भंगाराचा कारखाना होता. मात्र, कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. त्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी देणेकऱ्यांचा तगादा लागल्याने मित्तल कुटुंबीय हे पंचकूला येथील सकेत्री गावात राहायला गेले होते. त्यांच्यावर जवळपास 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. प्रवीण मित्तल हे उदरनिर्वाहासाठी कॅब चालवत होते.