Download App

Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?

  • Written By: Last Updated:

Prabhas Wedding: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) नेमकं कधी लग्न करणार, कोणाशी लग्न करणार याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत. ‘बाहुबली’सिनेमानंतर प्रभासच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. याअगोदर देखील त्याचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीबरोबर (Anushka Shetty) जोडलं गेलं आहे. (Social media) तर ‘आदिपुरुष’ सिनेमानंतर प्रभासचं नाव क्रिती सनॉनशी (Kriti Sanon) देखील जोडलं जात होतं. या चर्चांदरम्यान आता प्रभासच्या लग्नाबद्दल त्याची काकी श्यामला देवी यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली आहे.


प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘सलार’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाच्या शेड्युलमधून मोकळा झाल्यानंतर प्रभास लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु तो कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याबद्दल स्पष्ट होऊ शकलं नाही. प्रभासची जवळची व्यक्ती म्हणजेच त्याच्या घरातील काकी श्यामला देवी यांना नुकत्याच एका मुलाखतीच्या दरम्यान त्याच्या लग्नाबद्दल स्पष्ट केले आहे.

श्यामला देवी याबद्दल म्हणाल्या की, आमच्यावर दुर्गम्माचा आशीर्वाद आहे. देव आम्हा सर्वांची चांगली काळजी घेणार आहोत. प्रभासचं लग्न नक्कीच होईल आणि तेसुद्धा लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्वांना या लग्नावेळेस आमंत्रित करू. हा सोहळा जल्लोषपूर्ण असणार आहे. प्रभासच्या काकीने त्याच्या लग्नाबद्दल ही मोठी अपडेट दिल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे साऊथ सुपरस्टार लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Tiger 3 Trailer: भाईजान अन् कतरिना अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘टायगर-3’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आला होता. प्रभासने याअगोदर त्याच्या लग्नाबद्दल कधी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा त्याने त्यावर भाष्य केले आहे. एवढेच नाही तर त्याने लग्नाचं स्थळसुद्धा जाहीर केलं होतं. “मी इथेच तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे”, असं प्रभासने त्यावेळी म्हणाला होता. त्याचं हे उत्तर ऐकून चाहत्यांनी देखील जल्लोष केला होता.

‘बाहुबली’ फेम प्रभासचं नाव याअगोदर दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीबरोबर जोडण्यात आलं होतं. ‘बाहुबली’मधील ही जोडी सध्या जोरदार चर्चेत होती. परंतु अनुष्काने वेळोवेळी डेटिंगच्या चर्चा नाकारले आहेत. प्रभास आणि मी फक्त चांगले मित्र असल्याचे तिने अनेकवेळा सांगितले आहे.

Tags

follow us