Download App

मोदी-शाह संभाजी महाराजांचा पराक्रम ‘याचि देहि याचि डोळा’ पाहणार, संसदेत ‘छावा’ चं विशेष स्क्रिनिंग

Chhaava Screening In Parliament : बॉक्सऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून विकी कौशलचा 'छावा' (Chhaava) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने

  • Written By: Last Updated:

Chhaava Screening In Parliament : बॉक्सऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 583.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आता ‘छावा’ संसदेत (Chhaava Screening In Parliament) दाखवला जाणार आहे. माहितीनुसार, गुरुवारी संसद भवन ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृहात ‘छावा’ दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहे. याच बरोबर संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल (Vicky Kaushal) आणि चित्रपटातील इतर स्टारकास्ट उपस्थित राहणार असल्याची माहिती समाेर आली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाते कौतुक केले होते. या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून ‘छवा’ सोशल मीडियासह देशातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात देखील या चित्रपटामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.

नागपूर हादरलं ! एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून ‘छवा’ने देशासह विदेशात देखील भरपूर कमाई केली आहे. रविवारी 23  मार्च रोजी या चित्रपटाने 4.8 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे आतापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन 583.35 कोटी रुपये झाले. तर या चित्रपटाने 780 कोटींची कमाई केली आहे आणि त्यापैकी 90.50 कोटींची कमाई परदेशात झाली आहे.

follow us