राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; कुणाला कोणता पुरस्कार वाचा सविस्तर…

State Marathi Film Awards मुंबईत डोम एसव्हीपी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी 60 आणि 61 व्या राज्य पुरस्कांरांचे, वितरण करण्यात आले.

Letsupp Marathi (55)

Letsupp Marathi (55)

State Marathi Film Awards ceremony concludes with enthusiasm Read the details of who won which award : मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिकांच्या वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मंगळवारी मुंबईतील डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी 60 व्या आणि 61 व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच सन 2024 करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

डंख छोटा धोका मोठा! चीन, अमेरिकेत ‘या’ आजाराचे थैमान; जगभरात 2.4 लाख रुग्ण

यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अमृताचा पहिला-वहिला राज्य चित्रपट पुरस्कार! चंद्रमुखीसाठी झाला गौरव; पाहा खास फोटो

यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह चित्रकर्मी, चित्रपटरसिक आणि माध्यमकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“Dadar Kabutar Khana आंदोलन चुकीचंच, बाहेरच्या लोकांनी..”, मंत्री मंगलप्रभात लोढांनी स्पष्टच सांगितलं

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 60 व्या व 61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन 2022 व सन 2023 मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कार्यगटांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना, तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

नियुक्ती मागे घ्या, न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल; आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवार आक्रमक

तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझलगायक भिमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळाल्याबद्दल राज्य शासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघास सन्मानित करण्यात आले.

60 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार – 2022

1. उत्कृष्ट कला दिग्दर्शन – महेश कुडाळकर (उनाड)
2. उत्कृष्ट छायालेखन – अभ‍िजीत चौधरी / ओंकार बर्वे (4 ब्लाईन्ड मेन) व प्रियषंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही)
3. उत्कृष्ट संकलन – एस सुर्वे – (काटा कीर्रर्र)
4. उत्कृष्ट ध्वनिमुद्रण – सुहाश किशोर राणे (ह्या गोष्टीला नावच नाही)
5. उत्कृष्ट ध्वनिसंयोजन – लोचन प्रताप कानव‍िंदे – हर हर महादेव
6. उत्कृष्ट वेशभूषा – उज्वला स‍िंग – ताठकणा
7. उत्कृष्ट रंगभूषा – सुमेध जाधव / सौरभ कापडे – ताठकणा
8. उत्कृष्ट बालकलाकार – श्रीन‍िवास पोकळे (छुमंतर) / अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय)
9. सर्वोत्कृष्ट कथा – सुमीत तांबे (समायरा)
10. उत्कृष्ट पटकथा – तेजस मोडक – सच‍िन कुंडळकर (पॉन्डीचेरी)
11. उत्कृष्ट संवाद – प्रव‍िण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
12. उत्कृष्ट गीते – अभ‍िषेक खणकर – (अनन्या – गाणे – ढगा आड या )
13. उत्कृष्ट पार्श्वसंगीत – हनी सातमकर (आतूर)
14. उत्कृष्ट पार्श्वगायक – मन‍िष राजग‍िरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गाणे – भेटला व‍िठ्ठल माझा)
15. उत्कृष्ट पार्श्वगायिका (विभागून) – आर्या आंबेकर (चंद्रमुखी) व अम‍ित घुगरी (सोयर‍िक)
16. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे – गाणे – आई जगदंबे)
17. उत्कृष्ट संगीत – न‍िहार शेंबेकर (समायरा)
18. सहाय्यक अभिनेता – योगेश सोमण – (अनन्या)
19. सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)
20. उत्कृष्ट विनोदी अभिनेता – संजय नार्वेकर (टाईमपास 3)
21. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही)
22. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री – ऋता दुर्गुळे (अनन्या)
23. उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता खानव‍िलकर (चंद्रमुखी) सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)
24. उत्कृष्ट अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
25. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – झेन‍िथ फ‍िल्मस् (आतूर)
26. प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – प्रताप फड (अनन्या)
27. सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – समायरा
28. सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक – ऋषी देशपांडे
29. ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – गाभ
30. ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक – अनुप जत्राटकर
31. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.1 – धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
32. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.1 – प्रव‍िण तरडे
33. उत्कृष्ट चित्रपट क्र.2 – पॉन्डीचेरी
34. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.2 – सचिन कुंडलकर
35. उत्कृष्ट चित्रपट क्र.3 – हर हर महादेव
36. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.3 – अभ‍िजीत देशपांडे

61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

(1) उत्कृष्ट कला दिग्दर्शन – अमेय भालेराव (श्यामची आई)
(2) उत्कृष्ट छायालेखन – जिप्सी (प्रवीण सोनवणे)
(3) उत्कृष्ट संकलन – जिप्सी (अक्षय शिंदे)
(4) उत्कृष्ट ध्वनीमुद्रण – कुणाल लोळसुरे (श्यामची आई)
(5) उत्कृष्ट ध्वनीसंयोजन – विकास खंदारे (जिप्सी)
(6) उत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे (जग्गु आणि ज्युलिएट)
(7) उत्कृष्ट रंगभूषा- हमीद शेख व मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस)\
(8) उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) – कबीर खंदारे व त्रिशा ठोसर (नाळ २)
(9) उत्कृष्ट कथा – सुधाकर रेड्डी (नाळ २)
(10) उत्कृष्ट पटकथा – शशी चंद्रकांत खंदारे (जिप्सी)
(11) उत्कृष्ट संवाद – अंबर हडप व गणेश पंडित (जग्गु आणि ज्युलिएट)
(12) उत्कृष्ट गीते – वैभव देशमुख (नाळ २ – गरगरा भिंगोरी)
(13) उत्कृष्ट पार्श्वसंगीत – अद्वैत नेमळेकर (नाळ २)
(14) उत्कृष्ट पार्श्वगायक – मोहीत चौहान (घर, बंदूक, बिर्याणी)
(15) उत्कृष्ट पार्श्वगायिका – ऋचा बोंद्रे (श्यामची आई)
(16) उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राहुल ठोंबरे व संजीर हाउलदार (जग्गु आणि ज्युलिएट)
(17) उत्कृष्ट संगीत – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)
(18) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)
(19) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उषा नाईक (आशा)
(20) उत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गु आणि ज्युलिएट)
(21) उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा २)
(22) उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – दीपक जोइल (भेरा)उत्कृष्ट
(23) प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) – श्रद्धा खानोलकर (भेरा) आणि गौरी देशपांडे (श्यामची आई)
(24) उत्कृष्ट अभिनेता – अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट)
(25) उत्कृष्ट अभिनेत्री – रिंकू राजगुरू (आशा)
(26) उत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट)
(27) उत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी)
(28) उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट -आशा
(29) उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – दीपक पाटील
(30) उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – जिप्सी
(31) उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – शशी खंदारे
(32) सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ – भेरा
(33) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर भि़डे
(34) उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ – जग्गु आणि ज्युलिएट
(35) उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक २ – महेश लिमये
(36) उत्कृष्ट चित्रपट क्रमांक ३ – नाळ २
(37) उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक ३ – सुधाकर व्यंकटी रेड्डी
(38) विशेष बालकलाकार सन्मान – भार्गव जगताप (नाळ २)

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्यामची आई या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला

Exit mobile version