Download App

Aditya Kadam: नाटकानंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून दिसणार ‘या’ सिनेमात

Aditya Kadam Movie Debut: मुंबईमध्ये येऊन मोठ्या पडद्यावर चमकण्याची संधी मिळावी, हे स्वप्न अनेक जण बघत असतात. यामध्ये काही लोक मात्र केवळ हे स्वप्न पाहत नाही तर, ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना दिसतात. झगमगाटी विश्वात चमकण्याचे स्वप्न बघणाऱ्या अशाच लोकांपैकी एक नाव म्हणजे आदित्य कदम (Aditya Kadam). अनेक वेगवेगळे नाटकं, एकांकिका गाजवणारा हा चेहरा आता लवकरच एका मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लवकरच तो हिंदी सिनेमातून (Hindi cinema) चाहत्यांना भेटीला येणार आहे.

मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी अनेक कलाकारांची कायम धडपड सुरू असताना पाहायला मिळते. याबद्दल अनेकवेळा ऐकायला किंवा बघायला मिळालं आहे. गावामधून शहरात येत असताना सिनेसृष्टीशी जुळवून घेत ही कलाकार मंडळी आपला जम बसवत असताना पाहायला मिळत असतात. त्यांच्या या प्रवासाच्या पाठीमागे अर्थात कलाकारांची मेहनत असते. एवढेच नव्हे तर एका होतकरू कलाकारांमधील एक नाव म्हणजे आदित्य कदम. आदित्यने मनोरंजन (Entertainment) क्षेत्रात स्वबळावर आपलं विश्व तयार करत हिंदी सिनेसृष्टीत हटके एन्ट्री मारली आहे.

आदित्य कदम हा मूळचा कोल्हापूर असलेला अभिनेता याने स्वबळावर आणि मेहनतीच्या जोरावर हा मोठा पल्ला गाठल्याचे पाहायला मिळत आहे. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांच्या ‘बॉलिवूड रायझिंग अकादमी’ येथे त्याने अभिनयाचे धडे रंगविले आहे. तसेच त्याने मनोरंजनसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात देखील केली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांच्या ‘एएसपी फिल्म एंटरप्राईज प्रॉडक्शन’ने आदित्यला चांगलाच ब्रेक मिळवून दिला. ‘एएसपी फिल्म एंटरप्राईज प्रॉडक्शन’च्या एका नव्या प्रोजेक्टमधून आदित्य आता चाहत्यांना भेटीला येणार आहे. ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ या नव्याकोऱ्या रंजक आणि थरारक हिंदी सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर झळकण्यास तयार झाला आहे. एकांकिका, नाटकं करून आदित्यने रंगभूमीवर आपला मोठा जम बसवला होता. त्यांनतर आता आदित्य हिंदी सिनेमातून स्वतःच नावं मोठं करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Box Office Collection : ‘ओपनहायमर’ भारतात शंभर कोटींच्या क्लबमध्ये; ‘बार्बी’ची जगभरात छाप

आपल्या या यशाविषयी बोलत असताना आदित्य म्हणाला आहे की, ‘एकांकिका, नाटकं करत मी अभिनयाची आवड जोपासली. कालांतराने ही आवड शांत बसू देत नव्हती. तेव्हा मला ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ या हिंदी सिनेमाची ऑफर चालून आली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांनी मला खूप मोठी संधी चालून आली आहे, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन. मोठ्या पडद्यावर काम करणं, हे अर्थात प्रत्येक कलाकारांचं एक स्वप्न असतं, असंच स्वप्न उराशी बाळगून मी आळ्यचाहे त्याने यावेळी सांगितले आहे. आता मला मिळालेली संधी बघता माझं स्वप्न देखील पूर्ण झाल्याचे तो म्हणाला आहे, असंच मला वाटत आहे. परंतु इथेच न थांबता अजून देखील प्रोजेक्ट्सवर काम करायचं असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us