Box Office Collection : ‘ओपनहायमर’ भारतात शंभर कोटींच्या क्लबमध्ये; ‘बार्बी’ची जगभरात छाप

Box Office Collection : ‘ओपनहायमर’ भारतात शंभर कोटींच्या क्लबमध्ये; ‘बार्बी’ची जगभरात छाप

Oppenheimer Box Office Collection : ओपेनहायमर प्रदर्शित झाल्यापासून जगभरात मोठी चर्चा होती. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर देखिल धूमाकूळ घातला आहे. ओपेनहायमरने 100 कोटींचा टप्पा ओलांडत भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड IMAX चित्रपट बनला आहे. थिएटरमध्ये जवळपास दोन आठवडे पूर्ण केल्यानंतर, चित्रपटाने तिकीट विक्रीच्या बाबतीत बार्बीला मोठ्या प्रमाणावर मागे टाकले आहे. ‘बार्बी’ने आतापर्यंत 32.75 कोटी रुपये कमावले आहेत.

दरम्यान, जागतिक स्तरावर ‘बार्बी’ने बाजी मारली आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या ओपेनहायमरने $412.4 दशलक्ष (अंदाजे रु. 3,406 कोटी) कमाई केली आहे तर बार्बीने $800 दशलक्ष (अंदाजे रु. 6,606 कोटी) चा टप्पा ओलांडला आहे. हा सध्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

Australia Open 2023: एचएस प्रणॉयचे विजेतेपद हुकले, रोमहर्षक फायनलमध्ये पराभूत

भारतात ओपेनहायमर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला आहे. ओपेनहायमरने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित केले आहे, तर बार्बी फक्त इंग्रजीमध्ये प्रदर्शित झाला आहे. या आकड्यांनुसार बॅटमॅन बिगिन्सला मागे टाकत ओपेनहायमर नोलनचा सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत पोहोचताच चांद्रयानाचा पहिला मेसेज; मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण…

अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सिलियन मर्फी अभिनीत ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटाने आता 100 कोटी कमावले आहेत. हा चित्रपट भारतात वादात सापडला होता. सोशल मीडियावर काहींनी एका लैंगिक दृश्यावर टीका केली ज्यामध्ये सिलियन मर्फी भगवद्गीतेतील एक संस्कृत श्लोक वाचतो. विरोध असूनही, चित्रपटाने भारतात चांगली कमाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube