Australia Open 2023: एचएस प्रणॉयचे विजेतेपद हुकले, रोमहर्षक फायनलमध्ये पराभूत

Australia Open 2023: एचएस प्रणॉयचे विजेतेपद हुकले, रोमहर्षक फायनलमध्ये पराभूत

Australia Open 2023: भारताच्या एचएस प्रणॉयला आज ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगविरुद्ध तीन सेटपर्यंत चालेल्या रोमहर्षक सामन्यात पराभव स्विकारावा लागला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी BWF 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला वांग हाँगकडून 9-21, 23-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.

प्रणॉयला फायदा उठवता आला नाही
केरळच्या 31 वर्षीय प्रणॉयने पहिला सेट 21-9 असा गमावला. या सामन्यात वांगचे पूर्ण वर्चस्व दिसून आले. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. दुसरा सेट चांगला रोमहर्षक झाला आणि प्रणॉयने तो 23-20 असा जिंकला. शेवटच्या सेटमध्ये प्रणॉयने 19-14 अशी आघाडी घेतली पण इथून संपूर्ण सामना फिरला. वांगने जोरदार पुनरागमन करत स्कोअर 20-20 पर्यंत आणला. त्यानंतर पुढील दोन गुण घेत त्याने विजेतेपद पटकावले.

आयआयटी ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी, HAL मध्ये बंपर ओपनिंग्ज, लगेच करा अर्ज

वांगने बदला घेतला
याआधी या दोन खेळाडूंमध्ये एकच सामना झाला होता. त्या सामन्यात प्रणॉयने तीन सेटमध्ये विजय मिळवत मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. मात्र, यावेळी वांगने त्या पराभवाचा बदला घेतला.

Hariyana Violence : नूहमध्ये कर्फ्यूमध्ये तीन तासांची शिथिलता पण इंटरनेट…

प्रणॉयने प्रियांशूचा पराभव केला
मे महिन्यात मलेशियन मास्टर्स सुपर 500 जिंकणाऱ्या 31 वर्षीय प्रणॉयने शनिवारी ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत प्रियांशू राजावतचा 21-18, 21-12 असा पराभव केला होता. प्रणॉय म्हणाला, ‘विजयाचे श्रेय मला जाते कारण मी बदल स्वीकारण्यास आणि नवीन गोष्टी करून पाहण्यास तयार असतो. जी टीम माझ्यासोबत काम करत आहे ती खरोखरच अद्भुत आहे. सरावाच्या वेळी ते मला दररोज मदत करतात.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube