आयआयटी ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी, HAL मध्ये बंपर ओपनिंग्ज, लगेच करा अर्ज
Hindustan Aeronautics Limited Recruitment : आपलं शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी (Govt job) मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी 647 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवार 23 ऑगस्ट संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान याबाबतची तपशीलवार माहिती नोटिफिकेशमध्ये दिली आहे. (Hindustan Aeronautics Limited Recruitment for 647 Vacancies ITI Pass to Graduate can apply)
https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ
उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीशी संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
एकूण पदे – 647
पदांचा तपशील-
पदवीधर अप्रेंटिस- 186
डिप्लोमा अप्रेंटिस – 111
ITI अप्रेंटिसउमेदवार – 350
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस– संबंधित विषयातील पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयातील डिप्लोमा.
आयटीआय अप्रेंटिस – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास.
अधिकृत वेबसाइट – https://hal-india.co.in/
नोकरी ठिकाण – नाशिक.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1HG55ZV3SqkMqrB5qhFVdBK03FSI809qJ/view
अर्ज कसा करावा:
तुम्ही HAL अधिकृत वेबसाइटच्या करिअर विभागात जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
करिअर पेजवर क्लिक केल्यानंतर, सर्च मेन्यूमधील तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही इच्छित पदासाठी अर्ज करू शकता