Suhana Khan : अमिताभ यांचा नातू अन् शाहरूखच्या मुलीचं नातं ऑफिशियल? व्हिडीओ व्हायरल

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ती जेव्हा फॅशन डिझायनर तानिया श्रॉफच्या बर्थडेला गेली होती तेव्हाचा आहे. या बर्थडे पार्टीहून येताना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा याने तिला घरी सोडले. यावेळी त्याने तिला फ्लाईंग किस दिलं. त्यांच्या या व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चांना उधान आलं […]

Suhana Agstya

Suhana Agstya

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ती जेव्हा फॅशन डिझायनर तानिया श्रॉफच्या बर्थडेला गेली होती तेव्हाचा आहे. या बर्थडे पार्टीहून येताना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा याने तिला घरी सोडले. यावेळी त्याने तिला फ्लाईंग किस दिलं. त्यांच्या या व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चांना उधान आलं आहे. की, अमिताभ यांचा नातू अन् शाहरूखच्या मुलीचं नातं ऑफिशियल झालं आहे का ?

सुहाना आणि अगस्त्या सोबतच आपला चित्रपटातील डेब्यू करत आहेत. ते दोघे झोया अख्तरचा द आर्चीज या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. याच वेळी तानिया श्रॉफच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रेटी किड्स आले होते. त्यामध्ये सुहाना खान, आर्यन खान, खुशी कपूर, शनाया कपूर, अगस्त्या नंदा, निर्वान खान, अंजिनी धवन यांनी हजेरी लावली होती. बर्थडे बॅशचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. यामध्ये सुहाना आणि अगस्त्य नंदाच्या व्हिडीओवर गॉसिप सुरू झालं. तर तानिया श्रॉफ सुनील शेट्टीचा मुलगा अहानची गर्लफ्रेंड आहे. ती देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

भोला चित्रपटासह अजयच्या ‘मैदान’चा टीझरही रिलीज

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा या दोघांच्या मैत्री आणि नात्याविषयी चर्चा होत आहे. दरम्यान अशा काही व्हिडीओंमुळे या चर्चांना आणखी उधान येत. तसेच आता हे दोघ एकत्र डेब्यू करणार असल्याने यावर शिक्कामोर्तब देखील केलं जात आहे.

Exit mobile version