भोला चित्रपटासह अजयच्या ‘मैदान’चा टीझरही रिलीज

भोला चित्रपटासह अजयच्या ‘मैदान’चा टीझरही रिलीज

मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळाला आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘मैदान’असं या चित्रपटाचं नाव आहे. अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर आज 30 मार्चला रिलीज झाला आहे. त्यामध्येच अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

मैदान हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. अजय देवगणचा हा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. 60 वर्षांपुर्वीच्या एका माहित नसलेल्या नायकाची ही कथा आहे. ज्याने फुटबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अजय देवगणचा भोला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर मैदान हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी केलं असून यामध्ये अजय देवगणसह प्रियामणी आणि गजराज राव यांच्या भूमिका असणार आहेत. तर चित्रपटाचं प्रोडक्शन झी स्टुडिओज, बोनी कपूर, अरूणवा जॉय सोनगुप्ता आणि आकाश चावला यांनी केलं आहे.

पठाणनंतर ‘Mandala Murders’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

या चित्रपटाचा स्क्रिन प्ले आणि डायलॉग सायविन क्वाद्रस आणि रितेश शाह यांनी लिहिले आहेत. तर चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. चाहते आता चित्रपटाची आतुरतेना वाट पाहत आहेत. त्यांना हीा चित्रपट 23 जून 2023 ला भेटीला येणार आहे. दरम्यान अजय देवगणच्या भोलाची देखील चाहते आतुरतेना वाट पाहत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube