Download App

Baipan Bhari Deva: सुकन्या मोनेंनी पहिल्या पगारातून त्यांच्या आईसाठी घेतली होती ‘ही ‘गोष्ट!

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या मराठी सिनेमाला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वच  रेकॉर्डतोड तोडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठी (Marathi cinema) सिनेमासृष्टीमध्ये एका दिवसात सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिट (Superhit) सिनेमा ठरला आहे.


या सिनेमाची कथा चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमातील वंदना गुप्ते यांचा अभिनय चाहत्यांना जास्तच भावला आहे. नुकतच वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी सिनेमागृहात ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा पाहायला गेल्यानंतरचा पहिल्यांदा अनुभव शेअर केला आहे. सुकन्या मोने (Sukanya Mone) म्हणाल्या की, “कोलकात्यात आमचं ‘ओमकेश बक्षी’ याचे शुटींगचे काम सुरु होतं. ती माझी आयुष्यातील पहिली कमाई होती. मी माझ्या पहिल्या कमाईमधून कोलकात्यावरून माझ्या आईसाठी ६८ रुपयांची पहिली साडी आणली होती.

त्याअगोदर मला कोणत्याच कामासाठी पैसे मिळाले नव्हते. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तसेच बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या ३ दिवसात या सिनेमाने ६.४५ कोटींचा गल्ला कमावला आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी या सिनेमाने एकूण १३.५० कोटींची कमाई केली आहे. तर अजून देखील या सिनेमाची  चांगलीच घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

नुकतंच या सिनेमाच्या बजेटचा आकडा वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाचे बजेट फक्त ५ कोटी होते. परंतु या सिनेमाने बजेटच्या तुलनेत ५ पट जास्त कमाई केली आहे. तसेच हा सिनेमा ३० ते ३५ कोटींचा गल्ला करेल, अशी शक्यता सध्या वाटलेली जात आहे.

Tags

follow us