Download App

Sunny Leone चा केनेडी करणार आयआयएफ मेलबर्नचा समारोप

Sunny Leone Kennedy in IFF Melbourne : अभिनेत्री सनी लिओनीचा केनेडी हा चित्रपट मेलबर्नमध्ये सुरू असेलेल्या इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाच्या स्क्रिनिंगने या चित्रपट महोत्सावाची सांगता होणार आहे. त्यामुळे केनेडीच्या टीमसाठी हा सोहळा अत्यंत खास असणार आहे. सनीची प्रतिभा आणि जादू जगभारातील प्रेक्षकांवर आहे. या चित्रपटातील तिच्या चार्ली या भूमिकेसाठी तर तिचं विशेष कौतुक केलं जात आहे.

राज्यात पावसाची दडी! 329 गावं, 1273 वाड्यांना 351 टँकरने पाणीपुरवठा

केनेडी हा चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. तर सनीसोबत या चित्रपटामध्ये राहुल भट्टने मुख्य भूमिका म्हणजे सनीच्या सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत आहे. तर या चित्रपटाच्या स्क्रिनिंगने मेलबर्नमध्ये सुरू असेलेल्या इंडियन फिल्म फेस्टीवलची सांगता होणार आहे. हे या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा आहे.

Sonam Kapoor : मला कामाची प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते; सोनम करणार कमबॅक

मेलबर्नमध्ये 11 ऑगस्टला सुरू झालेल्या इंडियन फिल्म फेस्टीवलची सांगता 20 ऑगस्टला होणार आहे. यावर्षी या चित्रपट महोत्सावमध्ये भारतीय चित्रफटातील लैंगिकतेचा बदलणारा चेहरा या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तर या चर्चेत सनीसह केनेडीचे इतर कलाकार देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान केनेडी हा चित्रपट अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. त्यासाठी सगळेच उत्सुरक आहेत. दुसरीकडे सनीच्या आगामी तमिळ चित्रपटाचा म्हणजे कोटेशन गॅंगचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्यामध्ये ती जॅका श्रॉफ आणि प्रियामणी या कलाकारांसोबत दिसणार आहे.

Tags

follow us