Download App

Sunny Leone: सनी अन् डॅनियलच्या मुलांना PETA इंडियाचा कम्पॅशनेट किडचा खास अवॉर्ड

Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) पती डेनियल वेबर (Daniel Webber) आपल्या तिन्ही मुलांची जीवापाड काळजी घेतो. अनेकदा तो आपल्या मुलांसोबत दिसला आहे. कधी त्यांच्यासोबत खेळताना, कधी त्यांना फिरवतांना. आता डेनियलने आपल्या जुळ्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर (Photo Share) केला आहे. यामध्ये मुलांना PETA इंडियाचा कम्पॅशनेट (PETA India Compassionate) किड खास अवॉर्ड (KID Awards) देण्यात आला आहे.


सनी लिओनी आणि डेनियल यांनी यावर्षी मार्चमध्ये सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यापूर्वी सनीने निशा कौर वेबर हिला दत्तक घेतले आहे. दत्तक घेतेवेळी निशा केवळ 21 महिन्यांची होती. त्यामुळे सनी व डेनियलला आता एकूण 3 मुले आहेत, निशा, नोआ आणि अशर.

लग्नाअगोदर डेनियल आणि सनीने एकमेकांना बरेच वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा सनी डेनियलला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली होती. ज्यामध्ये डेनियलने सनीला इम्प्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु सनीने डेनियलला अजिबात भाव दिला नाही. तिच्यासाठी डेनियल केवळ एक केसोनोवा होता. दिवाळीत त्यांच्या मुलांनी पर्यावरणपूरक फटाके वाजवणार आहेत.

Priyanshu Panuli : प्रियांशु पैन्युली यांचा ‘पिप्पा’ सिनेमा रिलीजसाठी सज्ज!

तसेच प्राण्यांना त्रास देणाऱ्या मोठ्या आवाजापासून दूर राहून हा खास उत्सव साजरा करणार आहे. हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सनीने बॉलिवूड सिनेमामध्ये आतापर्यंत जेवढे हॉट सीन दिले आहेत, ते सर्व पती डेनियलसोबत दिले आहेत. डेनियल अशाप्रकारचे सीन देण्यासाठी सिनेमात बॉडी डबलचे काम करतो. डेनियल एखाद्या ड्रीम पतीप्रमाणे सनीला आपल्या हाताने जेवण बनवून भरवीत असतो. सनी लिओन आणि डेनियल वेबर केवळ चांगले लाइफ पार्टनर नाहीत तर चांगले बिझनेस पार्टनरही आहेत.

Tags

follow us