Shilpa Shetty : सुपर डान्सर चॅप्टर 5 मध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिल्पा शेट्टीला एक खास सरप्राईज देण्यात आलंय. ‘मस्ती की पाठशाला’ थीमसह बालपणाचा उत्सव साजरा करण्यात आलायं. शिल्पा जेव्हा शाळेत भेट देते तेव्हा एक भावूक क्षण येतो. 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सन्मानार्थ एक व्हिडिओ क्लिप सादर करण्यात येते. त्यामध्ये शिल्पाला शालेय आयुष्याचे सुंदर क्षण दाखवण्यात येतात. त्यामुळे शिल्पाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या क्लिपमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी, वर्गमित्र, शिक्षक आणि अगदी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही सामील झाल्या आहेत.
भारत-पाकिस्तान सामना रोखू शकत नाही; आशिया चषकावरील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली…
या भावूक क्षणी शिल्पा शेट्टी आपले अश्रू रोखू शकल्या नाहीत. डोळ्यांतून अश्रू वाहत त्यांनी सांगितले, खरं सांगायचं तर अजूनही विश्वास बसत नाही की, मी इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षं पूर्ण केली आहेत. मी कधीच कल्पना केली नव्हती की, मी आयुष्यात इतकं काही मिळवू शकेन. जेव्हा लोक सांगतात माझ्या प्रवासाने त्यांना प्रेरणा दिली, तेव्हा मी स्वतःला खूप आभारी आणि भाग्यवान समजते.
शाब्बास टीम इंडिया! पहिल्याच सामन्यात UAE ला चारली धूळ; फक्त 27 चेंडूतच सामना जिंकला
मला आनंद होतो की लोक मला सर्वप्रथम एक चांगला माणूस म्हणून ओळखतात आणि त्यानंतर माझ्या सर्व यशाची दखल घेतात. शाळेचे दिवस खरंच आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. मनोरंजनाने भरलेली परफॉर्मन्सेस, शालेय आठवणींनी ओथंबलेले क्षण आणि शिल्पा शेट्टी यांची हृदयस्पर्शी भावना यामुळे ‘मस्ती की पाठशाला’ हा भाग ‘सुपर डान्सर’च्या सर्वात संस्मरणीय भागांपैकी एक ठरला.
पहा ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’, दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी LIV वर.