शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी ‘या’ अटीवर केलं लग्न, राजकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा

शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी ‘या’ अटीवर केलं लग्न, राजकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा

Shilpa Shetty married Raj Kundra on ‘this’ condition, Raj makes a big revelation about the marriage : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा नेहमीच चर्चेत असतात. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत. या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पॉर्न व्हिडीओ प्रकरणामध्ये राज कुंद्राचा पाय खोलात असताना शिल्पा त्याला घटस्फोट देणार असल्याचीही तूफान चर्चा झाली. पण वाईट काळातही एकमेकांना खंबीर साथ देत त्यांनी सगळ्यांना खोटं पाडलं.

OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला, महादेव जानकरांचे हाके-पडळकरांना सणसणीत प्रत्युत्तर

नुकताच राजने शिल्पासोबतच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या शोमध्ये राजने अलीकडेच हजेरी लावली. शोदरम्यान त्याने शिल्पा सोबतची पहिली भेट ते लग्न असा प्रवासच सांगितला आहे. राज म्हणाला की, शिल्पासोबतच्या नात्याची सुरुवात त्याने स्वतः केली होती. 2009 मध्ये लग्न करण्यापूर्वी ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते’.

डेंग्यू ते मलेरिया… डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासून संरक्षणाचे घरगुती उपाय

पहिल्या भेटीचा किस्सा

राज कुंद्राने शिल्पासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा यावेळी सांगितला. राजने सांगितले की, शिल्पाचा मॅनेजर हा त्याचा चांगला मित्र होता. या मित्रामुळे त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्याची आणि शिल्पाची पहिली भेट दुबईत झाली. पहिल्या भेटीतच तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर राजने तिला लग्नासाठी प्रपोज केले. राजने शिल्पाला प्रपोज केले तेव्हा त्याचे भारतात असे काहीच नव्हते. साधे घर देखील नव्हते. त्याचा जन्म लंडनमध्ये झाला आणि त्याचा सर्व बिझनेस दुबईमध्ये असल्याने तो तिथेच स्थायिक झाला होता. पण शिल्पाला हे मान्य नव्हते.

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, भोपाळ हादरलं

शिल्पाने लग्नासाठी ठेवली ‘ही’ अट

शिल्पाला प्रपोज केल्यानंतर तिने राजला लगेच होकार दिला नाही. तिने लग्नासाठी राजपुढे एक अट ठेवली. शिल्पा म्हणाली की, ‘ती भारत सोडणार नाही’. राज म्हणतो, ‘तिने मला स्पष्टपणे सांगितले होते की, ती कोणत्याही परदेशी किंवा कोणत्याही एनआरआयशी लग्न करणार नाही. तिला फक्त भारतातच राहायचे आहे, ती भारतातून बाहेर जाऊ शकत नाही.’ राज म्हणतो की, ‘त्यावेळी माझे भारतात तर काहीच नव्हते पण तरी मला शिल्पाची ही अट मान्य होती’.

भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा

अखेेर शिल्पा राजला हो म्हणाली

राजने पुढे सांगितले की, ‘मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो. मी माझ्या आणि तिच्या नावावर अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर फ्लॅट खरेदी केला. तिला मी सांगितले की, लग्नानंतर मीच भारतात राहिल आणि तुझ्यावर भारत सोडण्यासाठी कधीच दबाव आणणार नाही. आपण फक्त फिरण्यासाठी विदेशात जात जाऊ. त्यानंतर तिने लग्नासाठी होकार दिला. राज पुढे म्हणतो की, तिच्यासाठी मी भारतात शिफ्ट झालो आणि माझा बिझनेसही भारतातून पाहू लागलो’.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube