Download App

Super Human Weapon Teaser: ‘बाहुबलीतील कट्टपाच्या आगामी सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Super Human Weapon Teaser : साऊथ मनोरंजन क्षेत्रातील ‘बाहुबली’ (Baahubali) आणि ‘बाहुबली २’ची चांगलीच चर्चा होते. बाहुबली, भल्लाळ देव, कटप्पा आणि सिनेमातील अनेक कलाकार आज देखील कायमच जोरदार चर्चेत असतात. अशातच सध्या कटप्पा देखील पुन्हा एकदा त्याच्या नव्या दमदार सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. (Social Media) कटप्पाचे पात्र साकारणारा अभिनेता सत्यराज (Sathyaraj) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बाहुबली २’नंतर अभिनेता सत्यराज एका दमदार सिनेमात पुन्हा एकदा झळकणार आहे. अभिनेता लवकरच एका सुपर ह्यूमन वेपनच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

नुकतंच सुपर ह्यूमन वेपनचा (Super Human Weapon) टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत, सत्यराज, वसंत रवी, तान्या होप, राजीव मेनन, राजीव पिल्लई हे कलाकार बघायला मिळणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन गुहान सेनिअप्पन यांनी केले आहे. तसेच या सिनेमासाठी निर्मिती मिलियन स्टुडिओने केली आहे. सध्या या खतरनाक टीझरने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमाच्या टीझरची सुरूवातच एका दमदार ॲक्शनने झाली आहे. सिनेमामध्ये सर्वच अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सत्यराज सिनेमात एका खलनायकाच्या मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या सिनेमातही त्याने दमदार ॲक्शन केल्याने सिनेमाबद्दल चाहत्यांना चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा असून संपूर्ण देशात सिनेमात प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीनंतर पहिल्यांदा मीडियाला भेटण्यासाठी सत्यराज मुंबईमध्ये आला आहे.

Sukhee Trailer: ठरलं तर मग! शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार ‘या’ दिवशी

मुख्य पात्र साकारत असताना सत्यराज यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारांना सिनेमाबद्दल माहिती दिली. मुंबईमध्ये आल्यावर सत्यराज यांनी पत्रकार परिषदेत आपल्या कामाच्या अनुभवाबद्दल आणि सिनेमातील भूमिकेबद्दल माहिती सांगितली आहे. सत्यराज यांना मुंबईमध्ये बघितल्यानंतर ते बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा डेब्यु करणार का? अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये दिपीकाच्या वडीलांचे पात्र साकारले आहे.

Tags

follow us