Superhero’S स्वच्छ भारत अभियान, खास रे टिव्हीवरील सुपरहिरोचे तुमच्यासाठी खास फोटो

khass re tv : सध्या एआय तंत्रज्ञानाचा (AI) वापर करून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते यांचे फोटोज तयार केले जातात. मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या खास रे टीव्हीने ही अशाच AI फोटोज् तयार केले आहेत. त्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुपरहिरोचे फोटोज् तयार करण्यात आले आहेत. ते भारतातील शहरात स्वच्छ भारत अभियान राबविताना […]

Letsupp Super Heros

Letsupp Super Heros

khass re tv : सध्या एआय तंत्रज्ञानाचा (AI) वापर करून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते यांचे फोटोज तयार केले जातात. मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या खास रे टीव्हीने ही अशाच AI फोटोज् तयार केले आहेत. त्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुपरहिरोचे फोटोज् तयार करण्यात आले आहेत. ते भारतातील शहरात स्वच्छ भारत अभियान राबविताना दिसत आहेत. प्रेक्षकांना ते खूप आवडले आहेत.

खास रे टीव्हीचे संजय श्रीधर कांबळे यांच्या संकल्पनेतून या सुपरहिरोजचे AI फोटोज तयार करण्यात आले आहेत. Batman, Chris Hemsworth, Robert Downeyjr, Om Holland, Chris Evans, Mark Ruffalo, Josh Brolin यांचे AI फोटोज् तयार करण्यात आले आहेत. त्यात ते स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छता अभियान राबविताना दिसत आहे. या फोटो मागे असलेल्या संकल्पनेबाबत संजय कांबळे म्हणाले, भारतामध्ये स्वच्छतेचे मोठा प्रश्न आहे. आपण स्वच्छ भारत अभियानही राबवत आहे. त्यामुळे भारतामध्ये हे सुपरहिरो आल्यानंतर भारत स्वच्छ करतील या संकल्पनेतून हे फोटो तयार करण्यात आले आहे.

संजय कांबळे हे गेल्या सात-आठ वर्षांपासून सोशल मीडिया आणि सोशल कंटेटमध्ये काम करत आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय नेते उद्धव ठाकरे, अजित पवार आमदार रोहित पवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी नगरसेवक वसंत मोरे यांचे फोटोज् तयार केले आहेत. प्रसिध्द अभिनेता अमेय वाघ यांचाही फोटो तयार केला आहे. संजय कांबळे यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मराठीत वेगवेगळे व्हिडिओ बनवून, त्यांना ट्रम्प तात्या ही ओळख दिली आहे. तसेच जागतिक पातळीवरील नेत्यांचे डम्बिग व्हिडिओ तयार केले आहेत.

Exit mobile version